
मध्यरात्री काही युवकांचे टोळके वाढदिवस साजरा करत होते. त्यांच्याकडून धिंगाणा सुरू असल्याने तेथील एका महिलेने...
ती गेली जाब विचारायला आणि तिलाच...
मालवण (सिंधुदूर्ग ) : शहरातील तानाजी नाका येथे मध्यरात्री धिंगाणा घालणाऱ्या युवकांनावविचारल्याच्या रागातून युवकांच्या टोळक्याने एका महिलेस व तिच्या दिरास मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संबंधित महिलेच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी संशयित युवकांविरोधात संबंधित महिलेने तक्रार दिली आहे.
हेही वाचा- या रेल्वे प्रकल्पाला का मिळेना गती..?
याबाबतची माहिती अशी, वायरी तानाजी नाका परिसरात मध्यरात्री काही युवकांचे टोळके वाढदिवस साजरा करत होते. त्यांच्याकडून धिंगाणा सुरू असल्याने तेथील एका महिलेने घराबाहेर येत धिंगाणा का घालत आहात असे विचारले. याचा राग आल्याने तेथे आलेल्या त्या महिलेच्या दिरास युवकांच्या टोळक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा- 295 वर्षांच्या किल्ल्याला मिळणार नवी उभारी...
कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण
त्याला सोडविण्यास गेलेल्या महिलेलाही त्यांनी मारहाण केली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे त्या महिलेच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण होते. या प्रकरणी त्या संशयित युवकांच्या विरोधात महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयितांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
Web Title: Criminel Hiting Women Sindudurg Kokan Marathim News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..