चिपळूणात कर्फ्यूला जनतेची संयमाने साथ...

मुझफ्फर खान
रविवार, 22 मार्च 2020

नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. खबरदारीच्या उपायोजना म्हणून 99 टक्के लोकांनी घरीच राहणे पसंत केले.

चिपळूण (रत्नागिरी) : करोनासारख्या जागतिक साथीच्या रोगाचा सामना करताना तालुक्यातील नागरिकांनी बंद पाळून संयम दाखविले. शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी सकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान ’जनता कर्फ्यु’चे पालन केरत आहेत.. अत्यावश्यक सेवाही सगळीकडे बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनता बंदमध्ये शंभर टक्के सहभागी झाली आहे. 

नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. खबरदारीच्या उपायोजना म्हणून 99 टक्के लोकांनी घरीच राहणे पसंत केले. चिपळूण शहर, अलोरे, पोफळी, खेर्डी, सावर्डे, रामपूर, कामथे, मार्गताम्हाने येथील बाजारपेठ सकाळी उघडलीच नाही. मुंबई - गोवा आणि गुहागर - विजापूर महामार्गावर शुकशुकाट होता. सकाळी 7 पासून नागरिकांनी घराबाहेर येण्याचे टाळले. ग्रामीण भागातील रस्त्यावरही कोणी दिसत नव्हते. मोहल्ले, सोसायट्यांमध्ये पुर्णपणे शुकशुकाट आहे. मेडिकल स्टोअर्स आणि गरजेच्या वस्तू विकणारी दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा- Janta curfew : भावा कुठे निघालास? काय काम आहे तुझे...?

कोकण रेल्वे सेवेवर परिणाम

’जनता कर्फ्यु’चा परिणाम कोकण रेल्वे सेवेवरही दिसून आला. कोकण रेल्वे मार्गावरील लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे चिपळूण स्थानकावर आज सकाळपासून एकही प्रवासी नव्हता. चिपळूणमधून रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबई, पुणे, ठाणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक आदी भागात जाणारी बससेवाही खंडीत करण्यात आली. 22 मार्च रोजी ’जनता कर्फ्यु’ आत्मसंयम, देशहितासाठी कर्तव्य पालनचा संकल्पतेचा एक प्रतिक असेल, असं पंतप्रधान मोदींनी गुरुवारी आपल्या संबोधनात म्हटले होते.

हेही वाचा- Coronavirus : आजाराची साखळी तुटू दे, पण आमच्या आधाराची साखळी तुटायला नको ...

पंतप्रधानांच्या या आवाहनाला चिपळूणातील रिक्षा व्यवसायिक, खासगी बससेवा आणि वडाप वाहतूक करणार्‍यांनी समर्थन दिले. तालुक्यातील रिक्षा, वडाप आणि जिल्ह्यासह जिल्ह्यातून बाहेर जाणार्‍या खासगी बसफेर्‍याही बंद करण्यात आल्या. करोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी पेट्रोल पंप मर्यादित वेळेसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय पेट्रोल डीलर असोसिएशनने घेतला होता. मात्र ग्राहक नसल्याने सकाळी 11 नंतर शहरातील पेट्रोल पंप बंद शहर आणि तालुक्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टही बंद ठेवण्यात आली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Curfew in the adhesive masses together in chiplun kokan marthi news