Konkan Railway : कोकणवासीयांवर अन्याय! दादर-रत्नागिरी पॅसेंजरबाबत रेल्वेमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली; रेल्वे प्रशासनाचा मनमानी कारभार

Why Dadar-Ratnagiri Passenger Train Remains Suspended : कोकणवासीयांची हक्काची दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी वाढत आहे. रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानंतरही कार्यवाही न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
Dadar Ratnagiri Passenger train restart latest news

Dadar Ratnagiri Passenger train restart latest news

esakal

Updated on

चिपळूण : उत्तर भारतात जाणाऱ्या दादर-गोरखपूर गाडीला कायमस्वरूपी मंजुरी देतानाच, कोकणवासीयांची हक्काची दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करणाऱ्या मध्य रेल्वेची प्रवाशांविषयीची अनास्था कायम (Konkan Railway passenger train restoration demand) आहे. ही गाडी पुन्हा सुरू करण्यासाठीची कार्यकारी व्यवहार्यता तपासण्याचे आदेश खुद्द रेल्वेमंत्र्यांनी एप्रिलमध्ये दिले होते. मात्र, त्याला दोन महिने उलटल्यानंतरही रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. मध्य रेल्वेच्या या मनमानीपुढे आता कोकण रेल्वे प्रशासनही हतबल झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com