Leopard Captured: डहाणू तालुक्यात बिबट्याची दहशत: चिंचणीमध्ये बिबट्या अखेर पिंजऱ्यात बंदिस्त; नागरिकांचा सुटकेचा निश्वास.

Dahanu Leopard Capture: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे वासरावर हल्ला केल्यानंतर बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद केला. परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
A leopard captured in a forest department cage at Chinchani village in Dahanu taluka, Palghar district.

A leopard captured in a forest department cage at Chinchani village in Dahanu taluka, Palghar district.

esakal

Updated on: 

​विनायक पवार

डहाणू: तालुका आणि लगतच्या किनारपट्टी भागात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या आणि नागरिकांची झोप उडवणाऱ्या बिबट्याला अखेर पिंजऱ्यात पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. चिंचणी येथील एका वाडीत लावलेल्या सापळ्यात हा बिबट्या जेरबंद झाला असून, या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांनी काही प्रमाणात सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Loading content, please wait...