esakal | Konkan Railway : आता दररोज विजेवर धावताहेत मालगाड्या!
sakal

बोलून बातमी शोधा

Konkan Railway : आता दररोज विजेवर धावताहेत मालगाड्या!

Konkan Railway : आता दररोज विजेवर धावताहेत मालगाड्या!

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते रत्नागिरी विद्युतीकरणाची चाचणी यशस्वी झाल्यानंतर नियमित मालगाड्यांचा प्रवास सुरू झाला आहे. दिवसाला एकपासून चारपर्यंत मालगाड्या विजेवर चालवल्या जात असल्यामुळे लवकरच कोकण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतुकीचीही चाचणी होण्याची शक्‍यता आहे.

वाहिन्यांमधून विजेचा पुरवठा विनाअडथळा सुरू होतो की नाही, हे पाहण्यासाठी २२ फेब्रुवारी २०२१ ला पहिला वीजप्रवाह सोडण्यात आला. त्यानंतर इंजिन चालवून पाहण्यात आले. पुढे काही दिवसांनी किरकोळ दुरुस्त्याही करून रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (सीआरएस) चाचणीही यशस्वी झाली. कोकण रेल्वे मार्गावरील हा टप्पा विद्युतीकरणासाठी सज्ज असल्याचा हिरवा कंदील सीआरएसने दिला. त्यानंतर गेले दोन महिने मालगाड्यांची नियमित वाहतूक सुरू झाली. पश्‍चिम रेल्वेकडून येणाऱ्या विविध मालाची वाहतूक करणाऱ्या गाड्या धावत आहेत.

हेही वाचा: दिल्लीतही राज्य करतो, देवगडचा राजा; महिलांचा प्रयोग यशस्वी

दिवसातून एखादी तरी गाडी प्रवास करते. कधी कधी दिवसातून चार गाड्या चालवण्यात येतात. आतापर्यंतचा मालगाड्यांचा प्रवास निर्धोकपणे सुरू आहे. डिझेल इंजिनसह विजेवर धावणारे इंजिनही याला जोडण्यात आलेले आहे. त्यामुळे इंजिन बदलण्यासाठी गाडी थांबवण्याची गरज पडत नाही. विद्युतीकरणामुळे वेळ आणि इंधन या दोन्हीची बचत होत असून पर्यावरण प्रदूषणही कमी होणार आहे. पूर्वी रोहा येथे विजेवर गाडी चालवण्यासाठीचे इंजिन बदलण्यात येत होते; परंतु सध्या ती गरज भासत नाही. सध्या धावत असलेल्या सर्व मालगाड्या कन्याकुमारी, तमिळनाडूपर्यंत जात आहेत.

कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते बेंगलोर या टप्प्याच्या विद्युतीकरणासाठी केंद्र शासनाने ११०० कोटींची तरतूद केली होती. त्यानुसार वेर्णा येथून प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. त्यानंतर रत्नागिरी ते रोहा २०४ किमीच्या विद्युतीकरणाला डिसेंबर २०१८ मध्ये आरंभ झाला. आता पुढचा टप्पा गाठला जाणार आहे.

हेही वाचा: मच्छीमारांचे पॅकअप: समुद्रातील पाण्याला करंट