सोशल मिडीयावर आमदाराची बदनामी; तक्रारीनंतर अनेकजण लेफ्ट 

Defamation on Social Media Many Lefts From Group
Defamation on Social Media Many Lefts From Group

दोडामार्ग - तालुका गोव्यात विलिनीकरणाच्या मुद्‌द्‌याबाबत तयार केलेल्या एका व्हॉट्‌सऍप ग्रुपवर आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात घाणेरडे शब्द वापरुन त्यांची बदनामी केल्याप्रकरणी पोस्ट टाकणाऱ्या व त्या ग्रुपच्या सर्व ऍडमिनवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. संबंधित स्क्रीनशॉटच्या प्रती आणि अर्ज देऊन त्यांनी कारवाईची मागणीही केली. 

निवडणुकीनंतर तालुका गोव्यात विलिनीकरण करण्याचा विचार पुढे आला आणि काहीजणांनी तालुका गोवा विलिनीकरण नावाने काही व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार करण्यात आले. त्यातील एका ग्रुपवर श्री. केसरकर यांची मानहानी करणारी अगदी खालच्या स्तरावरील टीका केली, असे या पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे. 

या पार्श्‍वभूमिवर आज येथे बैठकीसाठी आलेले जिल्हाप्रमुख संजय पडते, ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत केसरकर, तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, जिल्हा उपप्रमुख गणेशप्रसाद गवस आणि संजय गवस, गोपाळ गवस, नगरसेवक दिवाकर गवस, तुकाराम बर्डे, श्रेयाली गवस, विनिता घाडी, संजना कोरगावकर, संदीप कोरगावकर, दीपाली दळवी, भगवान गवस, सुषमा सावंत, श्रद्धा परब, गिरीश डिचोलकर, दशरथ मोरजकर, दौलत राणे, लवू मिरकर, मदन राणे, शिवराम मोर्लेकर, रोनाल्ड फर्नांडिस, बबलू पांगम आदींनी पोलिस ठाणे गाठत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. 

यावेळी त्यांनी दिलेल्या अर्जात ग्रुप ऍडमिन असलेल्या सर्वांवर तसेच ही पोस्ट टाकणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

घाडी यांचा ठिय्याचा इशारा 
संबंधित ऍडमिन आणि पोस्ट टाकणाऱ्यांवर सायंकाळपर्यंत गुन्हे दाखल होऊन अटक न झाल्यास उद्या (ता.14) सकाळी अकरा वाजल्यापासून महिला कार्यकर्त्यांसह पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख विनिता घाडी यांनी स्वतंत्र निवेदनाद्वारे पोलिसांना दिला. श्री. केसरकर अथवा अन्य पदाधिकाऱ्यांची बदनामी कदापी सहन केली जाणार नाही असेही त्या म्हणाल्या. 

अनेकजण लेफ्ट 
पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याचे कळताच त्या ग्रुपवरील बहुतेक ऍडमिन कारवाईच्या भीतीने ग्रुप वरुन लेफ्ट झाले. 

आणखी वाचा - 

दोडामार्ग तालुका गोव्यामध्ये विलिन करण्याच्या मागणी मागे आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com