Shiv Shinde
sakal
पाली - शिवाजी महाराजांबद्दल अथांग आदर व सार्थ अभिमान बाळगणारा एक तरुण सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाची तीव्र ओढ असलेला शिव एकनाथ शिंदे (वय-३०, रा. आडगाव भोसले, ता. कन्नड, जि. छ. संभाजीनगर) हा तरुण पाठीवर धान्य, कपडे, भांडी आणि डोक्यावर लोखंडी चौकटीवर विराजमान असलेला शिवरायांचा पुतळा घेऊन रणरणत्या उन्हात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संभाजीनगर ते त्र्यंबकेश्वर आणि तिथून पुढे किल्ले रायगड असा पायी प्रवास करत आहे. एकूण ३९ किलो वजनाचा हा संपूर्ण लावाजमा सांभाळत त्याचा हा खडतर पायी प्रवास सुरू आहे.