Ratnagiri News : देवरूखच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस मोबाईल मेडिकल युनिट बंद; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश

Devrukh Medical Officers Asked to Explain Service Disruption : संगमेश्वर तालुक्यातील दुर्गम भागांमध्ये आरोग्यसेवा देणारे मोबाईल मेडिकल युनिट बंद असल्याची दखल रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाने घेतली आहे.
Ratnagiri News

Ratnagiri News

esakal

Updated on: 

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील दुर्गम वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांना आरोग्यसेवा देण्यासाठी कार्यरत असलेली मोबाईल मेडिकल युनिट (एमएमयू) बंद असल्याच्या प्रकाराची जिल्हा आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी संगमेश्वर मोबाईल मेडिकल युनिटच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

एक ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात संगमेश्वर तालुक्यातील मोबाईल मेडिकल युनिट वाहन बंद असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने संबंधितांकडून खुलासा मागवला आहे. नोटिशीनुसार, एमएमयू वाहनाचे टायर खरेदीचे देयक कार्यालयाकडून १८ ऑगस्ट रोजी आदा केले असून, त्याबाबत कार्यालयाला कळवले होते. तरीही वाहन आरोग्यसेवेसाठी कार्यान्वित केले नसल्याचे नमूद केले आहे.

Ratnagiri News
CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

तसेच एमएमयूअंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्याने नियोजित आरोग्यसेवा तातडीने सुरू करावी, नियोजित क्षेत्रभेटी व आरोग्य शिबिरांमध्ये उपस्थित राहावे आणि एमएमयूच्या कामकाजाबाबत आवश्यक माहिती वरिष्ठ कार्यालयाला सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, एमएमयू सेवा बंद राहण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार योग्य ती कार्यवाही न केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे नोटिशीत नमूद आहे. तसेच यापूर्वीच्या दैनंदिन कामकाजाचा अहवालही कार्यालयाकडे सादर करण्यात आलेला नसल्याचे नमूद केले आहे.

Ratnagiri News
Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

४८ तासांची मुदत

मोबाईल मेडिकल युनिट कार्यान्वित नसल्याने कार्यक्षेत्रातील लाभार्थी आरोग्यसेवेपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी कोणाची, याबाबत खुलासा मागवला आहे. संबंधितांनी नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत खुलासा सादर करावा अन्यथा महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com