

CJP supporters stage a protest at Mumbai’s Shivaji Park over SIR and alleged election irregularities
esakal
मुंबईतील शिवाजी पार्क येथे गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सीजेपी आंदोलनादरम्यान एका ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. आंदोलनस्थळी आल्यानंतर त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.