आता मारणार नाही, सोडणार हवा! पोलिसांनी लढविली नामी शक्कल

devrukh police action Two wheeler
devrukh police action Two wheeler

साडवली - लॉकडाऊनच्या काळात देवरुख बाजारपेठेत दुचाकीला बंदी करण्यात आली आहे. तरीही अनेकजण खोटी कारणे देत घराबाहेर पडत आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देशात लाॅकडाऊन करण्यात आला आहे. तरीही काही नागरिकांना याचे गांभिर्य नाही. देवरुख पोलिस आता अशा विनाकारण फिरणार्‍या वाहनांची हवाच सोडत आहेत. यामुळे वाहने रस्त्यावर येण्याचे प्रमाण तरी कमी होईल असा पोलीसांचा विश्वास आहे.

देवरुख पोलिस, आरोग्य विभाग, महसूल विभागाने तालुक्यात कामांचे चांगले नियोजन केलेआहे. बाहेरुन नवीन कोणीही तालुक्यात येवू नये याची खबरदारी चेकपोस्ट घेत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी प्रशासन सज्ज असताना नागरिकांचे सहकार्य मिळत नाही ही खंत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता गाडीतील हवा सोडण्याची शक्कल लढविली आहे. 

दरम्यान, आता देवरुख शहरात घरपोच सामान पुरवण्याचे देवरुख नगरपंचायतीने नियोजन केले आहे. त्यासाठी यंसेवकांची नेमणूक केलेली आहे. तरीही नागरीक बाजारात गर्दी करताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com