रत्नागिरी : कठीण मोतिबिंदूच्या अवघड शस्त्रक्रिया होणार

इन्फिगो हॉस्पिटल; १० फेब्रुवारीपर्यंत सर्जनकडून सेवा
cataract  surgery
cataract surgerysakal

रत्नागिरी : मार्च २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर काळजीपोटी ज्येष्ठ नागरिकांनी अनावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर जाणे टाळले. यामुळे तातडीचे उपचार असणाऱ्या आजारांव्यतिरिक्त आरोग्याच्या इतर समस्यांकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे दात, डोळ्यांच्या आजाराच्या उपचारात खंड पडला. यात मोतिबिंदूच्या अनेक शस्त्रक्रिया करायच्या राहिल्या. याकरिता इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने अवघड, कठीण झालेल्या मोतिबिंदूच्या, सूक्ष्म शस्त्रक्रियांसाठी पंधरा दिवस विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे.

cataract  surgery
शेती उत्पन्न बाजार समितीच्या २९ कर्मचाऱ्यांची सेवा अधांतरीच

आजपासून १० फेब्रुवारीपर्यंत निष्णात व अनुभवी सर्जनकडून पडद्याचे आजार व मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा ज्यांना लाभ घ्यायचा आहे, त्यांनी पूर्वनोंदणी करून नेत्रतपासणी करून घ्यावी, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले.

cataract  surgery
अहमदनगर : दोषविरहित मतदार यादीवर भर ; राजेंद्र भोसले

मोतिबिंदू शस्त्रक्रिया प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. अरिंदम भट्टाचार्य करणार आहेत. ते भूल किंवा इंजेक्शन न देता व बिनटाक्याच्या सूक्ष्म शस्त्रक्रिया करणार आहेत. या शस्त्रक्रिया झाल्यावर अर्ध्या तासात त्या व्यक्तीला घरी जाता येईल. मधुमेहामुळे होणारे पडद्याचे आजार व पडद्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया राष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात रेटिना सर्जन डॉ. प्रसाद कामत करणार आहेत.

डॉ. ठाकूर यांनी सांगितले की, कोरोना साथीपूर्वीची आकडेवारी व साथीदरम्यान आणि सध्याचा एकंदरीत कल पाहता, प्रत्येक १०० लोकांमागे ९ ते ११ लोकांना मोतिबिंदू झाला असेल तर या काळामध्ये डॉक्टरांकडे न गेल्याने किंवा वेळीच शस्त्रक्रिया न केल्याने मोतिबिंदू कठीण किंवा कडक होण्याचे प्रमाण त्या ११ पैकी ४ व्यक्तींमध्ये आढळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com