esakal | नार्वेकर म्हणाले, दीपक केसरकर यांचा दावा अर्थहीन
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Narvekar Comment On Deepak Kesarkar Sindhudurg Marathi News

नार्वेकर म्हणाले, ""गेले आठ दिवस प्रचाराच्या निमित्ताने शहरात फिरताना भरपूर अनुभव आला. गेल्या चाळीस वर्षाचा नगरपालिकेतील अनुभव लक्षात घेतात लोकांकडून मला चांगला प्रतिसाद मिळाला.'

नार्वेकर म्हणाले, दीपक केसरकर यांचा दावा अर्थहीन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - दिलीप नार्वेकर हे कोणाच्या हातातील बाहुली नाही. त्यामुळे माझी उमेदवारी हा नारायण राणे यांचा डाव असल्याचा दीपक केसरकर यांचा दावा अर्थहीन आहे. ज्या नारायण राणेंमुळे केसरकर नगराध्यक्ष झाले त्यांच्याबद्दल त्यांना एवढा तिरस्कार का? असा सवाल कॉंग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप नार्वेकर यांनी येथे उपस्थित केला. जे आम्हाला पक्ष शिस्तभंगाच्या कारवाईची धमकी देत होते त्यांच्यावरच कारवाई झाल्याचे येत्या काही दिवसात दिसणार असा टोलाही त्यांनी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांचे नाव न घेता लगावला.

श्री. नार्वेकर यांनी येथील पक्षाच्या प्रचार कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी रमेश पई, बाळ बोर्डेकर, राजू मसुरकर, बाळा नमशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. नार्वेकर म्हणाले, ""गेले आठ दिवस प्रचाराच्या निमित्ताने शहरात फिरताना भरपूर अनुभव आला. गेल्या चाळीस वर्षाचा नगरपालिकेतील अनुभव लक्षात घेतात लोकांकडून मला चांगला प्रतिसाद मिळाला. आज जे उमेदवार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे आहेत त्यातील एकालातरी शासनाच्या नवीन जीआरबाबत अभ्यास आहे का? त्यामुळे अभ्यासू नेतृत्व म्हणून लोक आपल्या बाजूने उभे राहतील.'"

हेही वाचा - घाटात माकडाला बिस्किट देण्यासाठी गेला पुढे अन्... 

यासाठीच मी रिंगणात..

ते पुढे म्हणाले, "" येथील पालिकेत काम करताना 15 व्यावसायिकांना स्टॉलच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिला होता. तर चाळीस दिवसाच्या संपकाळात टोपलीतील संडास उचलण्याचे सामाजिक कार्यही आम्ही पार पडले होते. हे आजही लोकांच्या ध्यानात आणि मनात आहे. त्यामुळे शहरात आज एकटाच दिसतात ते एक प्रकारे घाण असून शहराचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून मी आज रिंगणात उभा आहे. लोकांचा असलेला प्रतिसाद या पाठिंब्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे; मात्र असे असले तरी हा लढा लढण्याची ताकत कॉंग्रेस पदाधिकारी व जिल्हा कॉंग्रेसच्या बळावर मिळाली. कॉंग्रेस पक्षाचा प्रचार करतानाही आम्हाला कारवाईची धमकी देणाऱ्यावरच येत्या काही दिवसात कारवाई होणार आहे.'"

हेही वाचा - पाठींबा हवा असेल तर शिवसेनेने ठेवला हा प्रस्ताव... 

त्यांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांचा मूर्खपणा

ज्या कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात संभाषण केले ते संभाषण आमच्याकडे असून त्याबाबत वेळोवेळी आम्ही पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधींकडे अहवाल पाठवला आहे. त्यामुळे लवकरच कारवाईचे सत्र येथे पाहायला मिळेल. माझी उमेदवारी हा राणे यांचा डाव असल्याचे केसरकर म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांचा मूर्खपणा आहे असेही नार्वेकर म्हणाले.

स्वार्थापोटी शिवसेनेचा प्रचार

राजू मसुरकर म्हणाले, ""आपल्या सुपुत्राला भविष्यात केसरकर यांचा वारसदार म्हणून आमदारकी मिळेल अशी आशा वाटू लागली आहे. शिवाय तसे आश्‍वासनही केसरकर यांनी दिले असावे म्हणून पक्षाच्या विरोधात जाऊन ते स्वार्थापोटी शिवसेनेचा प्रचार करत आहेत. सोनिया गांधी, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, आदींकडे याबाबत आम्ही तक्रार केली आहे.'"