esakal | ब्रेकिंग - रत्नागिरीत 'टू व्हिलर' लाही घातली आता बंदी ; जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

district administration decision in Ratnagiri kokan marathi news

काेराेनाला रोखण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने वेळोवेळी ताकीद देऊनही नागरिक मोठय़ा प्रमाणावर दुचाकी घेऊन रस्त्यावर येत असल्याने आज जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला.

ब्रेकिंग - रत्नागिरीत 'टू व्हिलर' लाही घातली आता बंदी ; जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी  : काेराेनाला रोखण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने वेळोवेळी ताकीद देऊनही नागरिक मोठय़ा प्रमाणावर दुचाकी घेऊन रस्त्यावर येत असल्याने आज जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यानी आज मध्यरात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, देवरुख, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या नगर परिषद व नगर पंचायत हद्दीमधील दुचाकी वाहनांना (दाेन चाकी)आज २८ तारखे च्या मध्यरात्रीपासून पुढील आदेश होईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा- कोकण रेल्वे आली आंबा उत्पादकांच्या मदतीसाठी ;  या नंबरवर संपर्क करा

आज रात्रीपासून बंदी
या बंदीमधून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना वगळण्यात आले आहे. या आदेशाची कालच अंमलबजावणी होणार होती परंतु लोकांच्या जीवनाश्यक गरजेकरिता प्रशासनाने कडक धोरण स्वीकारले नव्हते परंतु नागरिकांनी त्याचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर आज  वाहने रस्त्यावर आणली त्यामुळे लोकांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने हा कडक निर्णय घेतला .

हेही वाचा-कोरोनाच्या लढ्यासाठी दापोलीकरांनी लढवली अशी युक्ती....

यापुढे सर्वसामान्य नागरिक दुचाकी घेऊन रस्त्यावर येऊ शकणार नाहीत .असे कोणी आल्यास आता त्यांच्यावर कडक कारवाई करणेत येणार आहे याआधी प्रशासनाने चारचाकी व तीनचाकी व अवजड वाहनांवर जिल्ह्यात बंदी घातली आहे.

loading image