शैक्षणिक धोरणाबाबत विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले,

Dr Sunilkumar Lavte Comment On Educational Policy Sindhudurg Marathi News
Dr Sunilkumar Lavte Comment On Educational Policy Sindhudurg Marathi News

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास प्राथमिक शिक्षकांनी करणे गरजेचे आहे. येणारा काळात शिक्षण क्षेत्रातील बदलामुळे सेवा करणे कठीण असल्याचे मत येथील शिक्षक समिती शाखा 17 व्या त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये प्रसिद्ध विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले. 

राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखाचे 17 वे त्रैवार्षिक अधिवेशन मराठा समाज सभागृह येथे उत्साहात झाले. राज्याध्यक्ष उदय शिंदे यांच्या हस्ते अधिवेशनचे उद्‌घाटन झाले. 

राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, तालुकाध्यक्ष सचिन मदने, राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर, राज्य संघटक नितीन कदम, शरद नारकर, डी. बी. कदम, पतपेढी अध्यक्ष विठ्ठल गवस, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, कोल्हापूर शहर शिक्षक समितीचे सुधाकर सावंत, राज्य महिलाप्रमुख वर्षा केनवडे, राज्य महिला सल्लागार सुरेखा कदम, रोटरी क्‍लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष एकनाथ पिंगुळकर, इनरव्हील क्‍लबच्या डॉ. सायली प्रभू, रवळनाथ हाऊसिंग को. ऑप बॅंकेचे संस्थापक एम. एम. चौगुले, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, जिल्हा कार्याध्यक्ष सदानंद मोरे, पतपेढी संचालक संतोष मोरे, दिनकर तळवणेकर, आनंद तांबे, राजेंद्रप्रसाद गाड, त्र्यंबक आजगावकर, केंद्रप्रमुख विचारमंचचे चव्हाण, शिक्षक नेते सुनिल चव्हाण आदी उपस्थित होते. 

राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी तालुका शिक्षक समितीचे अभिनंदन करत तालुकाध्यक्ष सचिन मदने आणि टीमचे संघटनेचे कार्य राज्याला आदर्शवत असून विविध सामाजिक उपक्रम व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीचे उपक्रम राबवत आर्थिकदृष्ट्‌या मजबूत असलेल्या शाखेच्या त्रैवार्षिक अधिवेशनास उपस्थित राहता आले हे भाग्यच असल्याचे मत व्यक्त केले. 

या अधिवेशनात तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील व कुडाळ टॅलेंट डॉ. एपीजे अब्दुल कलाम परीक्षेतील तालुका गुणवत्ता यादीतील विद्यार्थी, शाळा, पालक यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षकांचे सत्कार करण्यात आले. दादा कोरगावकर पुरस्कृत आदर्श शिक्षक भूषण पुरस्कार सहदेव पालकर, अणावकर बंधू पुरस्कृत आदर्श कार्यकर्ता पुरस्कार दिनकर तळवणेकर, प्रविण वेटे पुरस्कृत आदर्श उपक्रमशील शिक्षक पुरस्कार अमोल गोसावी, सुरेखा कदम पुरस्कृत आदर्श महिला कार्यकर्ता पुरस्कार रूपाली तवटे यांना मानपत्र, शाल, श्रीफळ देवून गौरविण्यात आले.

रोटरी क्‍लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष एकनाथ पिंगुळकर, इनरव्हील क्‍लब ऑफ कुडाळच्या डॉ. सायली प्रभू, पल्लवी बोभाटे, संजना काणेकर, पद्‌मा वेंगुर्लेकर ,राजश्री पिंगुळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. एलईडी स्क्रीनवर शाखेच्या तीन वर्षातील उपक्रमांची क्षणचित्रे, लाईव्ह प्रक्षेपण, निनेटके नियोजन, आकर्षक सेल्फी पॉईंट, दीपस्तंभ नावाची स्मरणिका प्रकाशन, तालुकाध्यक्ष सचिन मदने यांचे प्रभावी उत्फूर्त भाषण ही खास वैशिष्ट्ये ठरली. सुत्रसंचालन श्रीकांत उगवेकर व सानिका मदने यांनी केले. अहवाल वाचन स्वामी सावंत, प्रास्ताविक सचिन मदने यांनी केले. 

अनेक प्रश्‍नांवर शासनस्तरावर पाठपुरावा सुरू 

आंतरजिल्हा बदली विनाअट करावी, जिल्ह्यातील 10 टक्के रिक्त पदांची अट शिथिल करावी, पतीपत्नी विनाअट बदली करावी, जुनी पेन्शन द्यावी, जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत विस्थापित शिक्षकांना स्वतालुक्‍यात येण्याची संधी शासनाने द्यावी, ऑनलाईन बदली प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर राबवावी, अशा अनेक प्रश्‍नांवर राज्य संघटनेकडून शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचेही राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com