
पाली - स्वातंत्र्याच्या सुवर्णं महोत्सवी वर्षानंतरही जातीवाद संपण्याचे नाव घेत नाही आहे. सुधागड तालुक्यातील नाडसूर गावात खाजगी नळावर पाणी भरण्याच्या वादावरून वृद्ध महिलेला जातीवाचक शिव्या देत बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (ता. 19) घडली आहे. याबाबत पाली पोलीस स्थानकात ऍट्रॉसिटी व इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.