Enron Land Acquisition : ‘ती’ जमीन परत करा, अन्यथा मोबदला द्या बाधित शेतकऱ्यांची मागणी; ‘एन्रॉन कंपनी’साठीचे भूसंपादन

610 Hectares Acquired for Dabhol Power Project in 1994 : गुहागर तालुक्यात एन्रॉनच्या दाभोळ वीज प्रकल्पासाठी १९९४ मध्ये संपादित करण्यात आलेल्या सुमारे ६१० हेक्टरपैकी २०० हेक्टर जमीन अद्याप वापराविना असल्याचा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा दावा आहे.
Enron Land Acquisition

Enron Land Acquisition

esakal

Updated on

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल-कातळवाडी, वेलदूर-घरटवाडी व रानवी येथील एन्रॉन कंपनीसाठी १९९४ साली भूसंपादन झाले. यावेळी सुमारे ६१० हेक्टर जमीन महाराष्ट्र शासनाने एन्रॉनच्या दाभोळ वीज प्रकल्पासाठी संपादित केली. यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ मधील तरतुदीप्रमाणे ज्या प्रकल्पासाठी जमीन संपादित केली गेली. यातील सुमारे २०० हेक्टर जमीन अजूनही वापराविना आहे.

त्यामुळे वापरात नसलेली जमीन शेतकऱ्यांना परत द्यावी, अशी मागणी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे केली आहे. अंजनवेल कातळवाडी बोरभाटलेवाडी येथे तीनही गावांच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर यशवंत बाईत यांनी प्रकल्पग्रस्तांची भूमिका पत्रकारांपुढे मांडली.

Enron Land Acquisition
Balumama Temple Admapur land Scam : लाखात घेतली, कोट्यवधींना देवस्थानला विकली; बाळूमामा ट्रस्ट जमिनीत 11 कोटींचा गैरव्यवहार, पाच मध्यस्थींना केली अटक

ते म्हणाले, १२ जुलै १९९४ ला जिल्हाधिकारी यांनी अंजनवेल येथील विठ्ठल मंदिरात वाटाघाटीने जमिनींचा दर जाहीर केला. यामध्ये भातशेती व बागायती जमिनींसाठी ७५ हजार प्रति हेक्टर, नागली, वरी जमिनीसाठी ६० हजार प्रति हेक्टर, वरकस व पोटखराब जमिनीसाठी ५० हजार प्रति हेक्टर जाहीर केले. वरील दरामध्ये ३० टक्के दिलासा व १२ टक्के अतिरिक्त घटक मोबदला असल्याचे तसेच झाडांच्या व जमिनीत असलेल्या बांधकामांच्या किंमती वेगळ्या असल्याचे तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

शासन व दाभोळ वीज कंपनी यांनी ७ जुलै १९९४ रोजी आपापसात ठराव केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी जो दर जाहीर केला त्यापैकी काही रक्कम दभोळ वीज कंपनी देईल. याविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाभोळ वीज कंपनी देणार असलेल्या सानुग्रह अनुदान व अतिरिक्त सानुग्रह अनुदान याचा जमिनीच्या किंमतीशी काहीह संबंध नाही. सानुग्रह अनुदान व अतिरिक्त अनुदान हे जमिनीच्या किमतीव्यतिरिक्त आहे, असे स्पष्ट केले होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविला होता. त्यावर उपसचिव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यांनी १५ जानेवारी २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून ही फरकाची रक्कम रत्नागिरी गॅस आणि पॉवर यांनी देण्यास कळविले. मात्र कंपनीने ही रक्कम देण्यास नकार दिला. हा विषय अजूनपर्यंत अनिर्णित असून शेतकऱ्यांना संपादित जमिनीच्या फरकाची रक्कम ३० वर्षानंतरही मिळालेली नाही.

ती कायद्याप्रमाणे व्याजासह मिळावी. तसेच संपादित जमिनीचा ताबा घेतल्यापासून पहिल्या वर्षी नऊ टक्के व दुसऱ्या वर्षापासून रक्कम अदा करेपर्यंत १५ टक्के व्याज असे मिळून आतापर्यंत सुमारे २ कोटी ५० लाख देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे व ती देणे कायद्यात तरतूद असल्याचे बाईत यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला विठ्ठल भालेकर, चंद्रशेखर बाईत, सुरेश देवाळे, गंगाराम भुवड यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Enron Land Acquisition
Ganesh Procession : साउंड सिस्टीमच्या ट्रॅक्टर मालकास; एक वर्ष कारावासासह ३० हजारांचा दंड

प्रसंगी ‘निरामय’साठी न्यायालयात जाऊ

कंपनी काळात रानवी येथील निरामय हॉस्पिटल हे पंचक्रोशीसाठी वरदान ठरलेले होते. मात्र, हे हॉस्पिटल कित्येक वर्षे बंद असून, त्यातील यंत्रणा, मशिनरी धूळ खात आहेत. हे रुग्णालय सुरू करण्यासाठी आम्ही बरेच वर्षे प्रयत्न करत आहोत. शासनही याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे येथील पंचक्रोशीतील प्रकल्पग्रस्तांवर हा अन्याय असून, हे रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रसंगी आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा विठ्ठल उर्फ बावा भालेकर यांनी यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com