आता जादा दराने खत विक्री केल्यास गुन्हा दाखल होणार

खते विकत घेत असताना शेतकऱ्यांनी त्याची पावती घेणे आवश्‍यक
आता जादा दराने खत विक्री केल्यास गुन्हा दाखल होणार

रत्नागिरी : खरीप हंगामासाठी आतापर्यंत जिल्ह्यासाठी युरियाचा एकूण साडेसहा हजार मेट्रिक टन तर झुआरी खताचा ७०० मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. रासायनिक खतांच्या (rate of fertilizer) गोणीवरील छापील किंमतीपेक्षा कुणी जास्त किमतीने खत विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित विकेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात (crime in ratnagiri) येणार आहे. जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्राना मुळ रक्कमेनुसारच खतविक्री करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत, असे जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी अजय शेंड्ये यांनी सांगितले.

छपाई किमतीपेक्षा जादा किंमत आकारता येत नाही. रासायनिक खतांच्या काही ग्रेडच्या किमती वाढल्या असल्या तरी जुन्या दराची खते (जुने दर छपाई असलेल्या बॅगा) जुन्याच दराने शेतकऱ्यांना विकणे बंधनकारक आहे. तसेच शेतकऱ्यांना पावती देणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात सर्व खत विक्री केंद्र, ग्रामीण सोसायट्यांपर्यंत खत पुरवठा सुरू झाला आहे. त्या ठिकाणाहून शेतकऱ्यांना खताची विक्री सुरू करण्यात आलेली आहे. खत विक्री केंद्राबाहेर खतांचे दरपत्रक लावण्याच्या सूचनाही सर्व विक्रेत्यांना करण्यात आल्या आहेत. खते विकत घेत असताना त्याची पावती घेणे शेतकऱ्यांना आवश्‍यक आहे, जेणेकरून होणारी फसगत टळण्यास मदत होईल.

आता जादा दराने खत विक्री केल्यास गुन्हा दाखल होणार
शाब्बास करवीरकन्या! एव्हरेस्टला गवसणी घालणारी कस्तुरी पहिली रणरागिणी

भरारी पथके, तक्रार कक्षाची स्थापना

कृषी विभागामार्पत जिल्हा, तालुकास्तरावर भरारी पथके व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष दररोज सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शेतकरी व निविष्ठा विक्रेते यांच्या अडचणी व्हॉटस्‌ऍपद्वारे दूर केल्या जातील. जिल्ह्यात खरीप हंगामात रासायनिक खते, बियाणी, कीटकनाशके गुणवत्ता भावात मिळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.

लेखी तक्रार येणे अपेक्षित

कुणी विक्रेता जुन्या दरातील खत वाढीव किंमत आकारून विकत असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्याकडे तक्रार करू शकता किंवा आपल्याकडे तक्रार करावी. जिल्ह्यात युरिया खताची मोठी मागणी आहे. सर्वसामान्य शेतकरी लॉकडाउनमध्ये मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे कृषिसेवा केंद्रात जास्त दराने खत विक्री करत असतील तर त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आहेत. त्यासाठी लेखी तक्रार येणे अपेक्षित आहे.

आता जादा दराने खत विक्री केल्यास गुन्हा दाखल होणार
मरियाना ट्रेंच...पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com