सामंत सेनेकडून रत्नागिरीच्या जनतेचा विश्वासघात; बाळ माने

education minister uday samant selected as a spokesperson of shivsena in ratnagiri
education minister uday samant selected as a spokesperson of shivsena in ratnagiri

रत्नागिरी : शहराची सुधारित नळपाणी योजना यावर्षी पूर्ण होणार, पुढच्या वर्षी पूर्ण होणार, असे सांगून पालिकेतील सत्ताधारी सामंतसेना आणि उच्च तंत्र शिक्षणमंत्री यांचे तोंड दुखले नसले तरी या थापा रोज रोज ऐकून रत्नागिरीकरांचे कान किटले आहेत. स्थानिक मंत्री आणि नगर परिषदेतील कारभारी नळपाणी योजनेबद्दल अजून किती काळ रत्नागिरीकरांची फसवणूक करणार आहेत. थांबवा आता हा खोटारडेपणा आणि योजना पूर्ण करून जनतेची पाण्याची तहान भागवा, असा टोला माजी आमदार बाळ माने(mla bal mane)यांनी लगावला आहे.(former-mla-bal-mane-criticism-on-inister-of-higher-technical-education-uday-samant-kokan-political-news)

२०१६ मध्ये मंजूर झालेली सुधारित नळपाणी योजना पाच वर्षांचा काळ उलटला तरी पूर्ण झालेली नाही. योजनेचे काम पाहता आणखी किती वर्षे योजना पूर्ण होण्यास लागतील.याची कोणतीही खात्री देता येणार नाही. ज्या विश्वासाने रत्नागिरीकरांनी सामंतसेनेच्या हाती सत्ता सोपवली होती, त्या जनतेच्या विश्वासाचा सामंतसेनेने गळा घोटला आहे, असा घणाघाती आरोपही माने यांनी केला.

माने म्हणाले, गेल्या तीन दशकांच्या तुलनेत यंदा रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरून गाडी चालविणे दूरच, पादचाऱ्याला रस्त्याने चालणेही अवघड झाले आहे. सत्ताधारी सामंतसेना केवळ आपले भले करण्याच्या कामात दंग आहे. त्यांना जनतेच्या समस्यांचे काहीच देणे घेणे नाही. पावसाच्या पहिल्याच दणक्यात रस्ते होत्याचे नव्हते झाले. मंत्री यांचेच, रस्त्यांची कामे करणारे कंत्राटदारही यांचेच असताना रस्त्यांची दुर्दशा का होते? पाईप लाईन, केबल टाकण्यासाठी रस्ते खणले असतील तर त्याची योग्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी मंत्री आणि सत्ताधाऱ्यांची नाही काय?

निवडणुकीच्या आधी काही कामे करून मते मागायची आणि निवडून यायचे आणि पुढील निवडणुकीपर्यंत काहीच करायचे नाही, हे सामंतसेनेचे राजकारण रत्नागिरीकर जनतेला चांगलेच कळले आहे. त्यामुळे पालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीत जनता सामंतसेनेला पराभूत करून नक्कीच धडा शिकवेल, असा विश्वास माने यांनी व्यक्त केला.

निवडणुकीसाठी रस्त्याचे राजकारण?

पालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या वर्षअखेरीस संपणार आहे. आता रस्ते केले तर पावसात खराब होतील. निवडणुकीत कोणते काम दाखवायचे असा प्रश्न सामंतसेनेला पडलेला असावां. शहरात गेल्या पाच वर्षात ठळक अशी विकासाची कोणतीच कामे झालेली नाहीत. त्यामुळेच पावसाळ्यानंतर निवडणुकीच्या आधी रस्त्यांची कामे करून मते मागायची, असे सामंतसेनेचे राजकारण असल्याचा आरोप बाळ माने यांनी केला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com