1500 वर्षांपूर्वी राजाने पत्नीच्या स्मरणार्थ कोरलेला शिलालेख दुर्लक्षित

सांगशी येथील मंदिरात हा प्राचीन शिलालेख असुन ग्रॅनाईट दगडावर ब्राम्ही लिपी कोरलेली आहे
1500 वर्षांपूर्वी राजाने पत्नीच्या स्मरणार्थ कोरलेला शिलालेख दुर्लक्षित

गगनबावडा : सांगशी (ता. गगनबावडा) येथील प्राचीन शिलालेखाकडे दुर्लक्ष झाले आहे. ऐतिहासिक स्मारकाची मागणी केल्यानंतर केवळ पाहणी करण्यात आली. त्यानंतर शासनाला विसर पडला आहे. कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटरवर असलेल्या गगनबावडा तालुक्यातील सांगशी येथील मंदिरात हा प्राचीन शिलालेख आहे. ग्रॅनाईट दगडावर ब्राम्ही लिपी कोरलेली आहे. इसवी सन पाचव्या शतकांमध्ये चालुक्य राजा मंगलेश याने पत्नी हलादेवीच्या स्मरणार्थ हा शिलालेख कोरला आहे.

दुर्मिळ, प्राचीन असला तरी सध्या मात्र दुर्लक्षित आहे. हा परिसर ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित व्हावे, अमूल्य ठेव्याचे जतन व्हावे म्हणून ग्रामस्थांनी पुरातत्त्‍व विभागाकडे मागणी केली होती. त्यानुसार फेब्रुवारी २०१३ मध्ये पाहणी झाली. त्यानंतर काहीच हालचाल झालेली नाही. पंधराशे वर्षांपूर्वीच्या या शिलालेखाचे संशोधन प्रथम १८९३ मध्ये डॉ. जे. एफ. फ्लिट यांनी केले. त्यानंतर पी. बी. देसाई, रा. प. पंडित यांनी संशोधन करून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. कन्नड विद्यापीठ हम्पीने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात हा प्राचीन असल्याचे मान्य केले आहे.

1500 वर्षांपूर्वी राजाने पत्नीच्या स्मरणार्थ कोरलेला शिलालेख दुर्लक्षित
रंग बदलण्याचे धाडसही महाविकास सरकारमध्येच : ठाकरेंचा दुजाेरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com