रत्नागिरीतील चार पीआय आणि पीएसआयच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 November 2020

वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल विभूते आणि ग्रामीण पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांचा समावेश आहे.

रत्नागिरी : जिल्हा पोलिस दलातील चार पोलिस निरीक्षक तर चार सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. यामध्ये वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल विभूते आणि ग्रामीण पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांचा समावेश आहे. यामध्ये कालावधी संपलेल्या आणि विनंती बदल्यांचा समावेश आहे.  

हेही वाचा -  ना मजुरीचा खर्च, ना मेटनन्सची चिंता ; दोनच तासांत करा साडेतीनशे भात पेंढीची झोडणी -

रत्नागिरी वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांची बदली रायगडला झाली आहे. रत्नागिरीत आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले अनिल गंभीर यांची बदलीही रायगडला झाली आहे. मंडणगडचे निरीक्षक सुदाम शिंदे यांची ठाणे ग्रामीणला, ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश कदम यांची पालघरला तर पालघरचे संजय आंब्रे यांची बदली रत्नागिरीत झाली.

जिल्ह्यातील बदल्या झालेल्या पोलिस उपनिरीक्षकांत दीपक कदम यांची बदली रत्नागिरीहून रायगडला झाली. संतोष वालावलकर रत्नागिरीहून सिंधुदुर्गला गेले. गुणाजी सकपाळ रत्नागिरीहून सिंधुदुर्गला तर नजीब इनामदार हे पालघरहून रत्नागिरीत आले आहेत. प्रमोद मेहेंदळे देखील पालघरहून रत्नागिरीत आले.

हेही वाचा - राणेंमुळेच केसरकरांचा उदय ः तेली -

शांताराम महाले यांची बदली ठाणे ग्रामीणहून रत्नागिरीत झाली तर सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर राऊत यांची बदली रत्नागिरीहून सिंधुदुर्गला झाली. जयदीप कळेकर यांची सिंधुदुर्गहून रत्नागिरीला बदली झाली. पोलिस उपनिरीक्षक म्हणून सागर चव्हाण, महेश धोंडे, प्रसाद शेनोळकर यांची नियुक्ती रत्नागिरीत झाली.

विभूते, कदमांचा चांगला ठसा

दांडगा जनसंपर्क असणारे जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याला आयएसओ मानांकन मिळवून दिले. वाहतुकीचे योग्य नियोजन करून वाहनधारकांना शिस्त लावणे, वरिष्ठांनी दिलेली कोणतीही जबाबदारी सुयोग्य नियोजन करीत पूर्णत्वास नेणे, हा त्यांचा हातखंडा होता. तसेच ग्रामीण पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनीदेखील जिल्ह्यात जनतेशी पोलिसांचे वेगळे नाते निर्माण केले होते. अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांचा हातखंडा होता.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four PSI and PI officers transfer in ratnagiri reason for time duration