रत्नागिरी : चार हजार भाविकांची गणपतीपुळ्यात हजेरी

संकष्टी चतुर्थीनिमित्त; एसटी बंदचा फटका
ganpatipule
ganpatipule

रत्नागिरी : शासकीय सुट्टीनंतर आलेली संकष्टी चतुर्थी आणि एसटी कर्मचाऱ्‍यांचा बंद याचा परिणाम बुधवारी (ता. २२) गणपतीपुळेत(ganpatipule) दिसून आला. दिवसभरात सुमारे चार हजार भक्तांनी श्रींच्या दर्शनाला हजेरी लावली. यामध्ये सर्वाधिक पश्‍चिम महाराष्ट्रातील(western maharshtra) पर्यटक वर्ग होता.नोव्हेंबरमध्ये अंगारकी चतुर्थी होती. त्यावेळी गणपतीपुळेत(ganpatipule) प्रचंड गर्दी झाली होती. आज ता. २२ रोजी संकष्टी चतुर्थीला प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. मंदिर व्यवस्थापनाकडूनही दर्शनासाठी मंडप उभारला होता.

दिवसभरात दर्शनासाठी येणाऱ्‍यांची गर्दी नियंत्रणात होती. सध्या एसटी कर्मचाऱ्‍यांचा बंद असल्यामुळे रत्नागिरी आगारातून एकही फेरी गेल्या सव्वा महिन्यात सुटलेली नाही. संकष्टीला दर्शनासाठी येणाऱ्‍यांमध्ये खासगी वाहने घेऊन येणाऱ्‍यांची संख्या अधिक होती. सकाळी एसटीने गणपतीपुळेत येऊन ते सायंकाळी परतीला लागतात. त्यामुळे या वर्गाची कमी जाणवत होती. अनेक पर्यटक दर्शन घेऊन किनाऱ्‍यावर जात होते. शासकीय सुट्ट्या, संकष्टी चतुर्थी यांसह पुढे येणारा ख्रिसमस यामुळे व्यावसायिकांचे अर्थकारणाला चालना मिळत राहणार आहे.

ganpatipule
नागपूर : एसटी कर्मचारी कामावर परतण्याच्या मार्गावर

पर्यटन व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस

पुढील आठवड्यात ख्रिसमस आणि नवीन वर्ष स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी किनारी भागात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पर्यटनस्थळही सज्ज आहेत. मागील आठवड्यातील शनिवार, रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशीही पर्यटकांचा राबता अधिक होता. कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाला उतरती कळा लागली होती. मंदिरे दर्शनासाठी चालू केल्यानंतर पर्यटन व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com