कोकणात मार्केटिंग कंपनीने घातलाय गोंधळ ; शंभरहून अधिक जणांची तक्रार

Fraud from Shri Swami Samarth Kripa Enterprises ratnagiri crime news
Fraud from Shri Swami Samarth Kripa Enterprises ratnagiri crime news

चिपळूण (रत्नागिरी) :  श्री स्वामी समर्थ कृपा एंन्टरप्रायझेसकडून फसवणूक झालेल्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर आपण फसलो, असे कबुल करून तक्रार करण्यास ग्राहक पुढे येत असून शंभरहून अधिक नागरिकांनी तक्रारी दाखल केली आहे. फसवणुकीची एकूण रक्‍कम 32 लाखावर पोचली आहे. 

खेर्डी येथील श्री स्वामी समर्थ कृपा एंन्टरप्रायझेस या मार्केटिंग कंपनीने चिपळुणातील 23 जणांची सुमारे 24 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पाच दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी श्री स्वामी समर्थ कृपा एन्टरप्रायझेसच्या संचालकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर चिपळूण पोलिसांनी या कंपनीची कसून चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. संबंधितावर गुन्हा दाखल होताच अन्य तक्रारदारही पुढे येऊ लागले असून फसवणुकीच्या रक्कमेतही वाढ झाली आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक नागरिकांनी याविरोधात तक्रारी दाखल केल्या असून फसवणुकीची रक्कम 32 लाखांवर पोहोचली आहे. 

नोकरी आणि कमिशनचे आमिष दाखवत श्री स्वामी समर्थ कृपा एन्टरप्रायझेस या मार्केटिंग कंपनीकडून तालुक्‍यातील 23 जणांना तब्बल 23 लाख 73 हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार बुधवारी उघड झाला आहे. यासंदर्भात कैलास मालुसरे (रा. गोंधळे-देऊळवाडी) यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिल्याने या कंपनीचे संचालक संजय चव्हाण (खेर्डी, माळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता असल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण करीत आहेत. 

अगदी पाचशे रूपयांपासून लाखो रूपये गुंतवणूक 
पोलीस स्थानकात हे प्रकरण जाताच या मार्केटिंग कंपनीकडून फसवणूक झालेले अनेक ग्राहक आता समोर येऊ लागले आहेत. अगदी पाचशे रूपयांपासून लाखो रूपये गुंतवणूक करणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. श्री स्वामी समर्थ कृपा एन्टरप्रायझेस कंपनीविराधात आतापर्यंत शंभरहून अधिक ग्राहकांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत. तक्रार घेण्याचे काम अजूनही सुरू राहणार आहे. या तक्रारीनुसार या प्रकरणात आतापर्यंत 32 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. 

संपादन- अर्चना बनगे


  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com