स्वातंत्र्य सैनिक मानधनापासून वंचित; अधिकाऱ्यांकडून हेटाळणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

पोर्तुगीजांच्या विरोधात गोवा मुक्तीसाठी ज्या सत्याग्रहींनी लढा दिला त्या स्वातंत्र्य सैनिकांना महाराष्ट्र शासनाकडून मिळणारे प्रोत्साहनपर मानधन गेली सात महिने थकीत असल्याने जिल्ह्यातील एकोणीस स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

सावंतवाडी  : पोर्तुगीजांच्या विरोधात गोवा मुक्तीसाठी ज्या सत्याग्रहींनी लढा दिला त्या स्वातंत्र्य सैनिकांना महाराष्ट्र शासनाकडून मिळणारे प्रोत्साहनपर मानधन गेली सात महिने थकीत असल्याने जिल्ह्यातील एकोणीस स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शासनाने तत्काळ हा निधी देऊन सहकार्य करावे. आम्हाला धरणे आंदोलन करण्याची वेळ आणू नये, असा इशारा स्वातंत्र्यसैनिक सैनिक वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी दिला आहे.

हे पण वाचा - सांगलीत आढळला दुर्मिळ पोवळा

केसरकर यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन वाचा फोडली असून मानधन तात्काळ न दिल्यास वेळप्रसंगी शासनाच्या विरोधात धरणे धरण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सोनाप्पा लाखे, देविदास इंगळे, विजय राऊळ, गुलाब शेख, आदी उपस्थित होते. केसरकर म्हणाले, गोवा मुक्तिसंग्राममध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९ सत्याग्रहींनी आपल्या जिवाची बाजी लावली होती. त्यांच्या कार्याची दखल म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांची गणना स्वातंत्र्यसैनिक म्हणून केली होती. शिवाय त्यांना पेन्शन स्वरूपात महिन्याला प्रोत्साहनपर मानधनही सुरू केली होती. मात्र हे मानधन गेल्या सात महिन्यांपासून स्वातंत्र्य सैनिकांना न मिळाल्याने जिल्ह्यातील 19 स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्यात 19 स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यापैकी बारा जण मयत आहेत. या बारा जणांच्या कुटुंबियांना शासनाकडून  मानधन सुरू आहे. आज ही रक्कम दहा हजार रुपये एवढी मिळत आहे. पात्र गेल्या सात महिन्यांपासून हे रक्कम न मिळाल्याने सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. आजच्या स्वातंत्र्य सैनिक 75 वर्षापेक्षा जास्त असल्याने त्यांच्या औषध पाण्याचा तसेच खाण्यापिण्याचा खर्च लक्षात घेता त्यांच्यावर आर्थिक ओढाताण होत आहे.

हे पण वाचा - काटेरी झुडपातून येत होता तिचा रडण्याचा आवाज...
 

ते पुढे म्हणाले, आपण याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली असता शासनाकडून अद्यापपर्यंत हा निधी उपलब्ध झाल्या नसल्याने आम्ही तो देऊ शकत नाही असे सांगण्यात आले. तर आपण मंत्रालयातील संबंधित विभागात त्याबाबत चौकशी केली असता. तेथील पक्ष अधिकाऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळेत हा निधी मागितला नसल्याने तो आम्ही दिला नाही. असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एकंदरीत स्वातंत्र्यसैनिकांबाबत येथील धिकार्‍यांमध्ये कोणत्याही प्रकारची तळमळ व आस्था तसेच सन्मान नसल्याचे जाणवले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Freedom fighters deprived of honor