

Ganeshotsav Special Trains
esakal
कणकवली: गणपती उत्सव आणि वीकेंडची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मडगाव-नागपूर आणि मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान धावणाऱ्या या विशेष गाड्यांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे : मडगाव-नागपूर-मडगाव विशेष ही मडगाव ते नागपूर (०११४०) दरम्यान दर मंगळवारी सायंकाळी ६ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ८ :२५ वाजता नागपूरला पोहोचेल.