

Kankavli Accident
ESakal
मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबईहून मोठ्या संख्येने गणेशभक्त कोकणाकडे रवाना होत असतानाच कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटवफाटा येथे भीषण अपघात घडला. गणेशोत्सवासाठी मालवणकडे निघालेल्या भाविकांच्या कारचा चालकावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. कार दुभाजकाला जोरदार धडकल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.