राजापुरात कोरोनाचे निम्म्याहून अधिक रुग्ण झाले बरे ; सारी साथीचे सतरा संशयित

half number of corona patients are fights on corona in chiplun but saari fever accused 17 people found in survey
half number of corona patients are fights on corona in chiplun but saari fever accused 17 people found in survey

राजापूर : तालुक्‍यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अडीचशेकडे जात असली तरी निम्म्याहून अधिक रुग्ण बरे झाले ही समाधानकारक बाब आहे. सद्यःस्थितीमध्ये संपर्कातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त असल्याने एकमेकांच्या संपर्कातून कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून प्रत्येकाने स्वतःहून योग्य ती काळजी घ्या असे आवाहन तहसीलदार वराळे यांनी केले. दैनंदिन सर्व्हेक्षणामध्ये सारी साथीचे सतरा संशयित रुग्ण सापडल्याची माहिती त्यानी दिली. 

शासनाच्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या उपक्रमाची तालुक्‍यामध्ये आरोग्य विभागाकडून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य विभाग आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून नियोजनाप्रमाणे घरोघरी सर्व्हेक्षणाला सुरवात झाली आहे. त्याला सहकार्य करून तालुकावासीयांनी कोरोनाचे संक्रमण रोखण्यास मदत करावी, असे आवाहन वराळे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले. तालुक्‍यातील घरांच्या संख्येप्रमाणे आजपर्यंत शहरामध्ये 21.93 टक्के तर ग्रामीण भागामध्ये 26.48 टक्के सर्व्हेक्षण झाल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांनी दिली. 

तालुक्‍यात राबविण्यात येत असलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेबाबत सविस्तर माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय साबळे आणि राजापूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री, आरोग्य विभाग विस्तार अधिकारी एम. के. जाधव यांनी दिली. सोशल डिस्टन्ससह कोरोनाला रोखण्यासाठी लोकांनी नेमके काय करणे गरजेचे आहे याबाबत माहिती दिली.

ताप, सर्दी असल्याने लोकांनी आरोग्य यंत्रणेकडून तत्काळ तपासणी करून घ्यावी, असे सांगितले. उपसभापती गुरव यांनी लोकांनी स्वतःसह आपल्या कुटुंबाची आणि सोशल डिस्टन्सद्वारे अन्य लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. तर व्यापारी संघाचे दीनानाथ कोळवणकर यांनी कोरोनाला रोखण्यासाठी व्यापारी संघाचे सर्वतोपरी सहकार्य राहणार असल्याचे सांगितले. या वेळी व्यापारी संघाचे पदाधिकारी, आरोग्य विभाग आणि नगर पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. 

दृष्टीक्षेपात

"माझे कुटुंब, माझी जबाबदारी' 
शहरी भाग ग्रामीण भाग एकूण 
तपासणी पथक 3 55 58 
पथक सदस्यसंख्या 9 165 174 
लोकसंख्या 9998 131589 141587 
घरे 2470 38155 40625 
दैनंदिन झालेले सर्व्हेक्षण 2723 29256 31979  

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com