दापोलीत कोरोना बाधिताचा मृत्यू : मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 59 वर...

राजेश कळंबटे
Thursday, 30 July 2020

मृत कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह...

रत्नागिरी : आज सकाळी प्राप्त माहितीनुसार हर्णे,  तालुका दापोली येथील एका 64 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज सकाळी 7.45 वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 59 झाली आहे.काल रात्री प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 54 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1746 झालेली आहे.

दरम्यान राजापूर शहरातील मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वच्या सर्व २२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. शहरातील मापारीवाडा मोहल्ल्यातील एका ६८ वर्षीय व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर रत्नागिरीत उपचार सुरू होते. नंतर त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा- शेतकऱ्यांना दिलासा ; रत्नागिरीत महात्मा जोतिराव फुले योजने अंर्तगत हे शेतकरी झाले कर्जमुक्‍त...यांची लिस्ट बाकी... -

दरम्यान त्या मृत कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २२ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आला असून सर्व निगेटिव्ह निघाले आहेत. तालुक्यात एकूण ६९ रुग्णांपैकी ५८ जण बरे होऊन घरी परतले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. एकूण सात जणांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा-कोरोना रॅपिड सेंटरबाबत सिंधुदुर्गात महत्त्वाचा निर्णय -

याचे विवरण खालीलप्रमाणे

 रत्नागिरी -      21
 कामथे    -       11
 कळंबणी   -    17
दापोली     -       3
रायपाटण    -     1
लांजा          -     1

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harne Taluka Dapoli one more covid patient death total death count is 59 in ratnagiri