esakal | गाईच्या शेणाच्या उपयोगातून श्रींची मूर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

chiplun

गाईच्या शेणाच्या उपयोगातून श्रींची मूर्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : गेल्या काही वर्षांच्या कालावधीत प्लास्टरच्या मूर्तींना छेद देण्यात येत आहे. याउलट आकर्षक इकोफ्रेंडली गणेशमूर्ती घडवणे, यावर भर दिला जात आहे. याचाच भाग म्हणून तालुक्यातील बोरगाव येथील वैभव चव्हाण या तरुणाने गाईचे शेण व गोमूत्राचा वापर करीत आकर्षक अशा गणेशमूर्ती घडविल्या आहेत. या मूर्तींना मागणीदेखील चांगली आहे. आतापर्यंत ८०० मूर्तींना पनवेल व पुण्यातून मागणी झाल्याने त्या पाठविण्यात आल्याचे कुस्तीपटू वैभव चव्हाण याने सांगितले.गायीच्या शेणापासून गणेशमूर्ती बनविण्याची अभिनव संकल्पना चिपळूण तालुक्यातील तरुणाने प्रत्यक्षात अंमलात आणली.

केवळ ५ टक्के माती व ती भिजविण्यासाठी गोमूत्र यांचा वापर करून शेणापासून मूर्ती बनविण्यात वैभव यशस्वी झाला आहे. बोरगाव मोरेवाडी येथील वैभवने शेतीचे शिक्षण घेतले आहे. रत्नागिरी जिल्हा कुस्ती पैलवान मानांकन यादीत तो सलग १२ वर्षे प्रथम आलेला आहे. राज्य कुस्ती संघटनेचा तो अधिकृत पंचही आहे

५ टक्के माती, ५ टक्के काथ्या; गायीही पाळल्या

यावर्षी प्रथमच त्याने गणेशमूर्ती बनविण्याचा संकल्प केला होता. शेण मिळविण्यासाठी त्याने गायीही पाळल्या आहेत. गणेशमूर्ती बनविताना वैभवने ५ टक्के माती, ५ टक्के काथ्या तर ९० टक्के गाईच्या शेणाचा वापर केलेला आहे. पाणी न वापरता मिश्रण करण्यासाठी गोमूत्राचा वापर करण्यात आला आहे.

हेही वाचा: कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वीर मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण

सामाजिक संस्थांकडून मोफत वाटप करणार

७६० मूर्तींना पुणे, पनवेल येथील सामाजिक संस्थांनी ऑर्डर केल्याने त्या पाठविण्यात आल्या असून या संस्था त्यांच्या भागात मोफत वाटप करणार आहेत. गणेशमूर्ती १८ इंचाच्या असून ३ प्रकारचे मॉडेल तयार केलेले आहेत. मूर्ती बनविण्यासाठी ३० मुलांचा ग्रुप असून ही सर्व मुले बाहेरील तालुक्यातील असून बोरगाव येथे येऊन वैभवला मदत करीत आहेत.

एक नजर..

  1. मूर्ती वजनाला हलक्या

  2. पाण्यात लवकर विरघळतात

  3. विसर्जन केल्याने कंपोस्ट मिळते

  4. फूल व फळझाडे यांना उपयोग

  5. भारतीय वृक्षांच्या बियांचा वापर

  6. विसर्जनानंतर वृक्ष वाढीस चाल

हेही वाचा: कणकवलीत बंद खोलीत किरीट सोमय्या, नितेश राणे यांच्यात खलबत्तं!

समाजात गायीला पवित्र स्थान आहे. गायीच्या शेणाचा वापर मूर्ती घडवण्यासाठी कधी झाल्याचे ऐकिवात नव्हते. रस्ते किंवा महामार्गावर गायी जखमी होतात. या मूर्तींपासून मिळालेले पैसे आम्ही जखमी गाईंसाठी खर्च करणार आहोत.

वैभव चव्हाण ,बोरगाव , ता. चिपळूण

loading image
go to top