
रत्नागिरीमध्ये सात लाख ९१ हजार जण जिल्ह्यात लसवंत
रत्नागिरी : कोरोना प्रतिबंधित लसीकरण मोहिमेला रत्नागिरी जिल्ह्यात(vaccination in ratnagiri district) चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण ९६.३६ टक्के असले तरीही १८ ते ४४ वयोगटातील ७४ टक्केच लोकांचा प्रतिसाद मिळाला. उर्वरित सर्व गटातील लोकांचे लसीकरण (vaccination)योग्य पद्धतीने सुरू आहे. दुसरी मात्रा घेणाऱ्यांचा टक्का ७३.२० असून, दोन मात्रा घेतलेले जिल्ह्यातील सात लाख ९१ हजार ९०० जण लसवंत झाले.
हेही वाचा: Nagar Panchayat : दापोलीत शिवसेना राष्ट्रवादी आघाडी सत्तेत
कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona)वेगाने पसरत असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाची तीव्रता कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून लसीकरण मोहिमेवर अधिक भर दिला आहे. राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या आढाव्यात ग्रामीण भागातील लसवंतांचे प्रमाण कमी असल्याचे दिसते. रत्नागिरी जिल्ह्यात परिस्थिती चांगली आहे. लसीकरणासाठी पात्र ठरलेल्यांची संख्या १० लाख ८१ हजार ९०० होती.
त्यातील १० लाख ४२ हजार ५१८ जणांनी पहिली मात्रा घेतली असून दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या ७ लाख ९१ हजार ९०० आहे. पहिला मात्रा घेणाऱ्यांमध्ये फ्रंट वर्कर, आरोग्य यंत्रणा यांच्यासह ४५ ते ५९ वयोगट आणि ६० वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण शंभर टक्केहून अधिक झाले आहे; मात्र पहिली मात्रा न घेणाऱ्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील लोकांचा समावेश जास्त आहे. या वयोगटातील ६ लाख ६५ हजार ९०० जणं पात्र असून त्यातील ४ लाख ८७ हजार ३४६ जणांनी पहिली मात्रा तर ३ लाख ४७ हजार ३४७ जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे.
हेही वाचा: ‘महाविकास’चा झेंडा;नाशिक जिल्ह्यात सरशी
मुलांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद
जिल्ह्यात बूस्टर डोस(vaccine booster dose) घेण्यासाठी ३४ हजार ४२९ जण पात्र असून, आतापर्यंत सहा हजार १७६ जणांनी लाभ घेतला आहे. तसेच, १५ ते १७ वयोगटातील ७१ हजार ७४४ जणांना पहिला डोस देण्यात येईल. आतापर्यंत ४३ हजार ३२० मुलांनी पहिला डोस(first dose of vaccine) घेतला असून, हे प्रमाण ६०.३८ टक्के आहे.
बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र -३४, ४२९
१५ ते १७ वयोगटाला पहिला डोस देणार - ७१, ७४४
मुलांनी पहिला डोस घेतला - ४३, ३२०
Web Title: In Ratnagiri 7 Lakh 91 Thousand People Are Vaccinated In The District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..