esakal | देवगडात परवानगीशिवाय फलक उभारण्यास मनाई
sakal

बोलून बातमी शोधा

priyanka salskar

देवगडात परवानगीशिवाय फलक उभारण्यास मनाई

sakal_logo
By
संतोष कुलकर्णी

देवगड: येथील देवगड जामसंडे शहरात लावण्यात येणार्‍या फलकांबाबत नगरपंचायतीने कालावधी ठरवून दिला आहे. परवानगीशिवाय शहरात फलक उभारण्यास मनाई करण्याबरोबरच नेमून दिलेल्या वेळेत संबधिताकडून फलक हटवले न गेल्यास नगरपंचायतीडून फलक जप्त करण्याचा निर्णय नगरपंचायत सभेत घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी दिली.

हेही वाचा: कोकणात मधुमक्षिकापालन व्यवसायाला मिळणार चालना

येथील देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये विनापरवाना तसेच परवानगी असलेले विविध प्रकारचे फलक, झेंडे लावण्यात येत असल्याने फलकांचा कालावधी संपल्यानंतर संबधिताकडून फलक हटवले जात नसल्याने शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचा मुद्दा समोर आला.

त्यानुसार नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नियमावली करण्यात आली आहे. यामध्ये देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये विविध प्रकारचे फलक, झेंडे लावण्याकरिता नगरपंचायतीची पूर्व परवानगी आवश्यक आहे. विना परवानगी फलक नगरपंचायतीकडून जप्त करण्यात येतील.

हेही वाचा: शिवसेनेची व्होट बॅंक फोडण्याचे आव्हान

परवानगी घेऊन लावण्यात आलेल्या फलकांची मुदत संपल्यावर संबधितानी फलक स्वतःहून हटविणे आवश्यक आहे. अन्यथा ते नगरपंचायतीकडून जप्त करण्यात येतील. व्यावसायिक जाहीरतीचा फलकाचा कमाल कालावधी एक वर्षाचा असेल. शिबीरे, वाढदिवस, श्रध्दांजली, शुभेच्छा आदी प्रकारचे फलकाकारिता कमाल कालावधी 15 दिवसांचा असेल. अशा बाबींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्यात आवाहन नगराध्यक्षा साळसकर यांनी केले आहे.

loading image
go to top