आम्ही मास्क लावून फिरतोय ​म्हणत दुसर्‍या दिवशी जनता रस्त्यावर...

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 23 मार्च 2020

शहरातील काही ठिकाणी रिक्षा व्यवसाय सुरू होता. त्यामुळे काहीजण रिक्षाने प्रवास करताना आढळले. महत्त्वाचे असेल तरच भाडे घ्या अशी तंबी पोलिसांनी रिक्षा व्यवसायिकांना केली.

चिपळूण (रत्नागिरी) : रविवारी जनता कार्फ्यु ला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. मात्र आज शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर लोकांची वर्दळ पुन्हा सुरू झाली आहे. 144 कलम लागू असल्याने गर्दी होऊ नये यासाठी पोलीसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली. त्यामुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली. 300 हून अधिक दुचाकीस्वारांना पोलिसानी हटकून माघारी परतवले. 

अत्यावश्क सेवा वगळता सर्वकाही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पंतप्रधान  नरेंद्र मोंदीनी रविवारी जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला शहरातील नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. सोमवारी शहरातील बाजारपेठ बंद असते. त्यामुळे दुकाने बंद होती. मात्र नागरिक घराबाहेर पडले होते.

 हेही वाचा- बाबांनो तब्येतीची काळजी घ्या...

शहरातील काही ठिकाणी रिक्षा व्यवसाय सुरू होता. त्यामुळे काहीजण रिक्षाने प्रवास करताना आढळले. महत्त्वाचे असेल तरच भाडे घ्या अशी तंबी पोलिसांनी रिक्षा व्यवसायिकांना केली.नागरिक आपली दुचाकी घेवून कामानिमित्त बाहेर फिरत होते. तर काहीजण शहरातील बंदची स्थिती जाणून घेण्यासाठी फिरत होते. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाईला सुरवात केली.

हेही वाचा- रत्नागिरीत संचारबंदी मात्र या सेवांना सुट...

आम्ही मास्क लावून फिरतोय ​

देवेंद्र पोळ यांनी पोलिसांचे पथक तयार केले होते. या पथकामार्फत बहादूरशेख नाका, चिंचनाका, काविळतळी, बसस्थानक परिसर, राष्ट्रीय महामार्ग वाहन चालकांवर कारवाई केली जात होती. आम्ही मास्क लावून फिरतोय असे काहीजण पोलिसांना सांगत होते. त्यानाही पोलिसांनी माघारी पाठवले. मात्र अत्यावश्यक कामानिमित्त जे घराबाहेर पडले त्यांना पोलिसांनी अडविले नाही. कुंभार्ली आणि कामथे घाटात पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते. येणार्‍या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात होती. अलोरे, पोफळी, शिरगाव आणि सावर्डे येथील नाक्यावर पोलिस तैनात करण्यात आले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: janta curfew next day the people on the street Kokan marathi news