esakal | जयंत पाटलांनी घेतली फिरकी ; तालुकाध्यक्षच झाले क्‍लीन बोल्ड  
sakal

बोलून बातमी शोधा

jayant patil tour on konkan area check various project information but does not answering correct in ratnagiri

महिला, युवक आणि बेसिकच्या सर्व शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षांकडून प्रदेशाध्यक्षांनी आढावा घेतला.

जयंत पाटलांनी घेतली फिरकी ; तालुकाध्यक्षच झाले क्‍लीन बोल्ड  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बूथ कमिट्यांचे महत्त्व पटवून दिले. तालुका व शहरातील कार्यकारिणी, त्यांनी राबवलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. उत्तर रत्नागिरीतील पाच तालुक्‍यांचा आढावा घेताना अनेक पदाधिकाऱ्यांची फिरकी घेतली. या फिरकीत चिपळूण तालुकाध्यक्ष मात्र क्‍लीन बोल्ड झाले. 

हेही वाचा - एमआयडीसीत मंदीनंतर संधी ; ४०० जणांना मिळणार रोजगार -

तालुक्‍यातील सावर्डा येथे उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, संगमेश्‍वर, आणि मंडणगड तालुक्‍यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक, महिला व आणि सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या संवाद बैठकीचे आयोजन केले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्येक तालुक्‍याचा स्वतंत्र आढावा घेतला. प्रत्येक तालुक्‍यात आणि शहरातील कार्यकारिणी, त्यातील सदस्य संख्या, शहरातील व तालुक्‍यातील एकूण बूथ, गत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला एकूण पडलेली मते, पक्षवाढीसाठी राबवलेले विविध उपक्रम, शहरासह तालुक्‍यात केलेल्या बूथ कमिट्या आदींची माहिती घेतली.

महिला, युवक आणि बेसिकच्या सर्व शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षांकडून प्रदेशाध्यक्षांनी आढावा घेतला. ही बैठक खास कार्यकारिणीतील सदस्यांसाठी आयोजित केली होती. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यातून नेमके किती पदाधिकारी आलेत, याची अचूक माहिती प्रदेशाध्यक्षांनी घेती. नवखे पदाधिकारी, महिला माहिती देताना चुळबुळत होते. या वेळी राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार रमेश कदम, संजयराव कदम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 

कामकाजाची शिस्त पाळा 

प्रदेशाध्यक्षांनी पक्ष कामकाजाची शिस्त आणि कामकाजाचे धडे दिले. बूथ कमिट्या स्ट्राँग असतील तरच पक्षाला बळकटी येईल. प्रत्यक्ष फिल्डवर विविध स्तरातील घटकांचा समावेश असलेली बूथ कमिटी मजबूत करण्याचे आवाहन केले. 

हेही वाचा - सिंधुदुर्ग किल्ला पर्यटनासाठी खुला ; होडीची वाहतुक सुरु -

फक्त गोलगोल फिरवू नका..

दरम्यान, संगमेश्‍वर तालुक्‍याचा आढावा सुरू असताना मध्येच चिपळूणचा विषय प्रदेशाध्यक्षांनी काढला. त्यांनी तालुकाध्यक्षांना उभे करून तालुका कार्यकारिणीची संख्या विचारली. त्यानंतर प्रत्यक्ष बैठकीच्या ठिकाणी किती पदाधिकारी आहेत, याची हात वर करून माहिती घेतली. नेमके येथे सात ते आठ सदस्य उपस्थित होते. ही जाहीर सभा नाही. फक्त कार्यकारिणी सदस्यांची बैठक आहे, फक्त गोलगोल फिरवू नका, असे सांगून तालुकाध्यक्षांना त्यांनी निरुत्तर करीत क्‍लीन बोल्ड केल्याची चर्चा बैठकीच्या ठिकाणी सुरू होती.

संपादन - स्नेहल कदम 

loading image