धोक्‍याची घंटा :  एकाच वाडीत, एकाच दिवसात 27 जणांना कोरोनाची बाधा

khed 27 person covid 19 positive ratnagiri health marathi news
khed 27 person covid 19 positive ratnagiri health marathi news

खेड (रत्नागिरी) : खेड तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे, असे वाटत असतानाच तालुक्‍यातील वरवली धुपेवाडी येथे एकाच दिवशी 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्‍यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी एकाच वाडीत इतक्‍या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित याआधी आढळून आले नव्हते. आरोग्य यंत्रणेने गावात ठाण मांडून या 27 जणांच्या संपर्कात आलेल्या ग्रामस्थांचा शोध घ्यायला सुरवात केली आहे. 

खेड तालुका कोरोनामुक्त होत असताना अचानक दुर्गम भागातील वरवली गावच्या धुपेवाडीत एकाच दिवशी 27 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्‍याला पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. वरवली धुपेवाडी येथील मंदिरात 8 फेब्रुवारीच्या रात्री भजन होते. त्याला सारे ग्रामस्थ एकत्र आले होते. दुसऱ्या दिवशी 9 तारखेला यातील एका व्यक्‍तीला ताप यायला लागला. तो लगेचच आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी गेला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याचा स्वब घेऊन तो तपासणीसाठी रत्नागिरीत पाठवला. त्याला तत्काळ कळंबणी येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्याची पुन्हा अँन्टिजेन टेस्ट घेतली. त्याचा अहवाला पॉझिटिव्ह आला. दरम्यान, स्वॅंबचा अहवालही पॉझिटिव्ह आला. 

दरम्यान, 8 तारखेच्या कार्यक्रमात त्या व्यक्तिचा गावातील अनेकांशी संपर्क आल्यामुळे तालुका आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. वरवली धुपेवाडी येथील 47 ग्रामस्थांचे स्वब घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. 27 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली. आरोग्य यंत्रणेसाठी ही धोक्‍याची घंटा असल्याने तालुका आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 27 जणांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील विशेष वार्डमध्ये दाखल करण्यात आले. वरवली-धुपेवाडी येथे एकाच दिवशी 27 जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने तालुक्‍याची कोरोनामुक्तीकडे सुरू असलेली वाटचाल अचानक थांबली आहे. 

रत्नागिरी येथे हलविले वरवली गावात 9 तारखेला आढळून आलेल्या पहिल्या कोरोनाबाधित रूणाची प्रकृती ढासळली असल्याने त्याला कळंबणी येथून रत्नागिरी येथे हलविण्यात आले असून, रत्नागिरी येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

वरवलीमधील एक रुग्ण 9 फेब्रुवारीला आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाला. त्याचा स्वॅब पॉझिटिव्ह आला. गावामध्ये कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला आहे. प्रत्येक घरात सर्व्हेक्षण करण्यात येत असून प्रत्येकाचे स्वॅब घेण्यात येत आहेत. 
- राजेश शेळके, तालुका वैद्यकीय अधिकारी 

एक नजर... 
- धुपेवाडीतील मंदिरात 8 रोजी होते भजन 
- 9 तारखेला यातील ग्रामस्थाला आला ताप 
- आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात केले उपचार 
- कोरोना लक्षणे आढळल्याने घेतला स्वॅब 
- उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाला केले दाखल 
- पुन्हा अँन्टिजेन टेस्ट घेतली, अहवाल पॉझिटिव्ह 
- भजनातील सहभागी 47 जणांचे स्वब घेऊन तपासले 
- 27 जणांची चाचणी आली पॉझिटिव्ह 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com