

Khed Diva MEMU Special
esakal
खेड : खेड, दापोली व मंडणगड विधानसभा मतदार संघात मुंबईहून आलेल्या गणेशभक्तांचा खेड-दिवा अनारक्षित मेमू स्पेशल गाडीतून मोफत प्रवास व्हावा यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुढाकार घेतला आहे. चाकरमान्यांसाठी २० व २१ रोजी ही गाडी सोडण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत.