Khed : लॅंग्वेज लॅबने भाषेविषयी आत्मविश्वास वाढतोय

आयसीएस महाविद्यालयात उपक्रम
Khed
Khedsakal

खेड : येथील आयसीएस महाविद्यालयात गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत असलेला लॅंग्वेज लॅबचा प्रयोग यशस्वी होताना दिसत असून, कोकणातील विद्यार्थ्यांचे भाषेवरील प्रभुत्व वाढवण्यासाठी हा प्रयोग उपयुक्त ठरत असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. मुंबई विद्यापीठासह शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या प्रयोगाचे कौतुक केले आहे.

शिक्षण-क्षेत्रामध्ये भाषेचे व संवादाचे महत्त्व लक्षात घेऊन येथील सहजीवन शिक्षणसंस्थेच्या आयसीएस महाविद्यालयामध्ये २१ जानेवारी २०१९ ला संस्थाध्यक्ष हिराभाई बुटाला यांच्या प्रेरणेने समृद्ध भाषिक प्रयोगशाळा (लॅंग्वेज लॅब) उभारण्यात आली. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमधून संवादकौशल्य व उच्चार यांचे ज्ञान दिले जाते. त्यासाठी ३० संगणकयंत्र या प्रयोगशाळेत बसवण्यात आले आहेत. भाषेतील विविध अंग समजून घेण्यासाठी व त्यांचा सराव करण्यासाठी संगणक, ध्वनीमुद्रक व सीडी प्लेअर व मायक्रोफोन यांचा वापर केला जातो. या लॅबमध्ये विविध तज्ञ व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. गेल्या दोन शैक्षणिक वर्षामध्ये चार तुकड्या बाहेर पडल्या आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये मुलाखतीसाठी लागणारा आत्मविश्‍वास, भाषेवरील प्रभुत्व व शैली यांचे संस्कार करण्यात महाविद्यालयाला यश आले आहे. त्यामुळे हा लॅंग्वेज लॅबचा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे.

केवळ भाषेवर प्रभुत्व नव्हे तर या प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासामध्येदेखील हातभार लावला जात आहे. व्यक्तीच्या विकासात भाषा किती महत्वाची ठरू शकते याचा प्रत्यय या लॅबमध्ये येतो. मराठी मातृभाषा असतानाही इंग्रजीमधून विविध स्तरावर कसा संवाद साधता येईल याचे कौशल्य विविध प्रयोगांच्या माध्यमातून या लॅबमध्ये विकसित करून घेतले जाते. त्यामुळे आयसीएस महाविद्यालयातून बाहेर पडणारे अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी भाषेबाबत आत्मविश्वास बाळगतात. व्याकरण, उच्चार आणि आत्मविश्‍वासाची शिदोरी घेऊन या लॅबमधून बाहेर पडणारा विद्यार्थी सर्वच क्षेत्रात यशाच्या दिशेने मार्गक्रमण करू शकतो.

इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी

दिल्ली येथील एका संस्थेतून प्रेरणा घेऊन ही लॅब उभी करण्यात आली आहे. खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आमच्या महाविद्यालयात शिकत असून, त्यातील अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी या लॅबचा उपयोग होत आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी इंग्लिश लॅब काम करते आहे. कॉर्पोरेट जगामध्ये एखादी पदवी असूनदेखील मोठमोठ्या कंपनीतून मुलाखतीदरम्यान मुलांना इंग्रजी भाषेच्या अडचणी जाणवतात. त्यामुळे या लॅबमधून शिक्षण घेतल्याचा विद्यार्थ्यांना निश्‍चित फायदा होत आहे, अशी माहिती आयसीएस महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. सचिन भोसले यांनी दिली. असा होतो फायदा

मुलाखतीसाठी लागणारा आत्मविश्‍वास

भाषेवरील प्रभुत्व व शैली यांचे संस्कार

व्याकरण, उच्चार अन् अचूकता वाढते

व्यक्तिमत्त्व विकासासही लागतो हातभार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com