गाडी मागे लाव अस तो म्हणताच त्याने घुसवला सुरा पोटात....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

दारूची गाडी कार्यालयाच्या मागे का लावली नाही या वादातून हा प्रकार घडला. यातून सूर्यवंशी याने आपल्या हातात असलेल्या सुर्‍याने वार केले.. 

बांदा (सिंधुदुर्ग) : बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या तिघा संशयितांना पकडून गाडी जप्त केल्याच्या रागातून चक्क राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात धाव घेऊन तेथील कर्मचाऱ्यावर सुर्‍याने हल्ला केल्याचा प्रकार इन्सुली येथील तपासणी नाक्यावर मध्यरात्री घडला. यामध्ये एक शासकीय कर्मचारी जखमी झाला आहे. रमेश चंदुरे असे त्याचे नाव आहे.

हेही वाचा- Photo : ओपीडी बंद केल्याने रुग्णांची झाली घालमेल...

ही घटना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली येथील तपासणी नाक्यावर घडली. याप्रकरणी सावंतवाडी-माजगाव येथील तिघांवर हल्ला करुन शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- गुढीपाडव्याला होणारी राजगड गावातील गाड्याची आणि किल्ल्यावरील यात्रा रद्द...

नितीन प्रकाश सूर्यवंशी (रा. माजगाव-तांबळगोठण), संभाजी विनायक देसाई (रा. कुंभारवाडा) व बाळा राठवड (रा. कासारवाडा) अशी या संशयातांची नावे आहेत. जप्त केलेली दारूची गाडी कार्यालयाच्या मागे का लावली नाही या वादातून हा प्रकार घडला. यातून सूर्यवंशी याने आपल्या हातात असलेल्या सुर्‍याने वार केले यात चंदुरे हा कर्मचारी जखमी झाला. तेथील कर्मचारी शैलेंद्र चव्हाण यांनी बांदा पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती बांदा पोलिस ठाण्यातून देण्यात आली. अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knife attack in sindudurg kokan marathi news