Konkan: दुकानांवर मराठी पाट्या न लावल्यास कारवाई ; नोटीस दिली जाणार नाही

marathi pati
marathi pati saka
Published on

Konkan News: राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत शनिवारी (ता. २५) संपत आहे. या पार्श्‍वभूमीवर दुकानांवर देवनागरी लिपित ठळक मराठीत पाटी नसल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जाईल. त्यासाठी दुकानदारांना कोणतीही नोटीस दिली जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी दिली.

marathi pati
Yeola Marathi Sahitya Sammelan: येवल्यात शनिवारी, रविवारी पहिले मराठी साहित्य संमेलन

रत्नागिरीतील दुकानदारांनी आपल्या दुकानावर ५ डिसेंबरपूर्वी मराठी पाटी लावावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ च्या कलम ३६ ‘क’ (१) च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला कलम ७ नुसार दुकानांवर मराठी भाषेतून ठळक अक्षरांत नामफलक लावणे बंधनकारक आहे.

marathi pati
Marathi Nameplate: मराठी मध्ये नामफलक नसेल तर मंगळवार पासून कारवाई, असा बसेल दणका !

त्यासाठी जिल्ह्यात सर्व दुकानदारांनी मराठीत बोर्ड लावावे, असे आवाहन वारंवार केले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील मराठी फलकांचा विषय उचलून धरला आहे. आता तर थेट प्रशासनाने याबाबत सर्व दुकाने आणि आस्थापनांना इशारा दिला आहे. मराठीत फलक लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्याची मुदत आज संपत आहे. त्यामुळे उद्यापासून प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे.

marathi pati
Marathi News Update: उत्तरकाशीत बचाव कार्य थांबवण्यात आलं ते निवडणूक आयोगात सुनावणी, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com