Maharashtra government policy on fallow agricultural land
esakal
रत्नागिरी : शेतीसाठी मजुरांची कमतरता, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीतील घटता आर्थिक परतावा यामुळे कोकणातील मोठे क्षेत्र लागवडीबाहेर राहिले (Ratnagiri district fallow land area in hectares) आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी करून ती पडीक ठेवणाऱ्या जमीनधारकांनी पुढील तीन ते पाच वर्षांत शेती उत्पादन सुरू करावे, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. जमीन वापरविषयक महाराष्ट्र शासनाच्या २०२३-२४ च्या आकडेवारीनुसार कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये चालू पड आणि इतर पड मिळून तीन लाख ७४ हजार २०० हेक्टर जमीन पडीक आहे.