कोकण : ११ कोटी फुकट गेल्याची टीका अज्ञानातून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाप्रळ-आंबेत पुल
कोकण : ११ कोटी फुकट गेल्याची टीका अज्ञानातून

कोकण : ११ कोटी फुकट गेल्याची टीका अज्ञानातून

मंडणगड: म्हाप्रळ-आंबेत पुलाच्या बळकटीकरणाचे नेमके कोणते काम पूर्ण झाले आहे व कोणते काम अद्याप बाकी आहे, याची कोणतीही खातरजमा न करताच अज्ञानाने ११ कोटी रुपये फुकट गेल्याची टीका केली जात आहे. खासदार सुनील तटकरे यांना माहिती न घेता लक्ष्य करण्यात येत आहे. ,राज्यात सध्या तीन पक्षांचे एकत्र सरकार आहे. त्यामुळे हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी तीनही पक्षांची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी केले आहे.

हेही वाचा: शिवसेनेचे नेते अशोक भावके यांचे अपघाती निधन

खासदार तटकरे यांच्यावरील टीकेचा समाचार घेताना मुकादम म्हणाले, सावित्री पूल दुर्घटनेनंतर म्हाप्रळ-आंबेत पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले. हा पूल धोकादायक झालेला असल्याचा अहवाल प्राप्त झाला, त्या वेळी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी तत्कालीन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. बांधकाम विभागाने सहा महिन्यांपूर्वी या पुलाचे बळकटीकरणाचे काम पूर्ण केले. पुलाला निधी मंजूर होऊनही काम रखडले होते. दोन वर्ष स्थानिकांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या मंडणगड व दापोली तालुक्यांचे मुंबई-पुणे मार्गावरील वाहतुकीची मोठी अडचण झाली होती. याकरिता खासदार तटकरे, पर्यटनमंत्री आदिती तटकरे यांनी पाठपुरावा करून पुलाच्या रेंगाळेल्या कामाचा प्रश्न मार्गी लावला. या मार्गावरील वाहतूक खुली केली. या पार्श्वभूमीवर टीकाकारांनी या संदर्भातील खरी माहिती घेऊन मगच लोकप्रतिनिधींना दूषणे द्यावीत.

हेही वाचा: "ED च्या धमक्या देत शेकडो कोटी गोळा केले, सोमय्या जेलमध्ये जाणार"

समजून घेऊनच टीका करावी

गेल्या आठवड्यात पुलाची समस्या गंभीर असल्याचे लक्षात येताच तटकरे यांनी पाहणी करून आवश्यक दुरुस्तीकरिता दहा कोटी रुपयांचा निधी तातडीने मिळवून देण्याचे तसेच या कामात आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. टीका करण्यापेक्षा निधी कोण देतो, पूल कोण बांधतो, कामावर नियंत्रण ठेवतो, झालेल्या घटनाक्रमात खरोखरच कोणाची चूक आहे, हे समजून घेऊनच टीका करावी. कोणाचीही बदनामी करण्याचा पवित्रा घेऊ नये, असे मुकादम यांनी सांगितले.

Web Title: Konkan Criticism 11 Crores Went Free Out Ignorance

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..