Konkan Politics : कोकणात ठाकरे गटाला दणका; संगमेश्वरात सामंतांनी पाडले खिंडार, पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

संगमेश्वर तालुका भगवमेय करण्यासाठी पालकमंत्री सामंत यांनी पावले उचलली आहेत.
Thackeray Group Activists join Shinde Group Sangameshwar
Thackeray Group Activists join Shinde Group Sangameshwaresakal
Summary

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विकासकामांसाठी जिल्ह्यात जोरदार मोहीम हाती घेतली आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्याबरोबरच संगमेश्वरमध्ये ही पक्षप्रवेश करून घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्धव बाळासाहेब शिवसेनेला खिंडार पाडले आहे. संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी येथील पदाधिकारी, ग्रामस्थ, सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Thackeray Group Activists join Shinde Group Sangameshwar
मोठी बातमी! गृहमंत्र्यांच्या जवळच्या नेत्याचा सुपारी देऊन खून; लोकसभा निवडणूक लढवण्याच्या होते तयारीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विकासकामांसाठी जिल्ह्यात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. गावातील छोट्या-मोठ्या विकासकामांसाठीही त्यांनी निधी उपलब्ध करून देत लोकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेना (Shiv Sena) वाढू लागली आहे.

संगमेश्वर तालुका भगवमेय करण्यासाठी पालकमंत्री सामंत यांनी पावले उचलली आहेत. संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी येथील पदाधिकारी, ग्रामस्थ, सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला.

Thackeray Group Activists join Shinde Group Sangameshwar
Karnataka Politics : 'या' दोन बड्या नेत्यांमधला वाद टोकाला; हायकमांड करणार हस्तक्षेप, काँग्रेस सरकार धोक्यात?

या वेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, डिंगणी येथील गावकऱ्यांनी पालकमंत्री म्हणून माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्याचे मी स्वागत करतो. तुमच्या गावातील कामे करण्यासाठी मी कठीबद्ध आहे. पक्षप्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांनी उबठामध्ये राहून गावाच्या विकासाचा पत्ता नाही, म्हणून गावाच्या विकासासाठी आम्ही ग्रामस्थांनी एकत्र येऊन पालकमंत्री सामंत यांच्या पाठीशी उभे राहीलो आहोत असे सांगितले. पक्ष प्रवेशाला किरण सामंत, अण्णा सामंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित आदी उपस्थित होते.

Thackeray Group Activists join Shinde Group Sangameshwar
Shivaji Maharaj : राजकोट समुद्रकिनारी उभारण्यात येणार छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा; 'या' दिवशी PM मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये डिंगणी सरपंच समीरा खान, शाखाप्रमुख विशाल कदम, दत्ताराम नितोरे, भगवान खाडे, सचिन राऊत, योगेश खाडे, तुकाराम पाकतेकर, गावकर वामन काष्टी, गावकर पांडुरंग पैजे, रमेश मोहिते, विनायक कदम, रमेश नितोरे, राजेश काष्टे, संतोष काष्टे, पांडुरंग जांभळे, दिनेश काष्टे, बारका काष्टे, शिवराम मुंडेकर, चंद्रकांत गावडे, सिताराम मुंडेकर,बाजी काष्टे, नागचंद्र कदम दिलीप कदम आदींचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com