

Konkan Railway
esakal
बेलापूर: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि महामार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी कोकण रेल्वेने मागील वर्षी सुरू केलेला कार रो-रो सेवा प्रायोगिक प्रकल्प यंदा गुंडाळण्यात आला आहे. या सेवेला ग्राहकांकडून अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे कोकण रेल्वेने हा निर्णय घेतला असून, यंदाच्या गणेशोत्सवात ही सेवा उपलब्ध असणार नाही.