esakal | वादळ घोंगावणाऱ़ म्हणून कोकणात कुठे आले एनडीआरएफचे पथक...वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

In konkan Where the NDRF team arrived read

अरबी समुद्रात दोन चक्रीवादळे निर्माण झाली होती. त्यापैकी एक भारताच्या दिशेने सरकत असून त्याचा फटका मुंबईसह कोकण किनारपट्टीला बसणार आहे.

वादळ घोंगावणाऱ़ म्हणून कोकणात कुठे आले एनडीआरएफचे पथक...वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीसह मुंबईला बसण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून रत्नागिरी जिल्ह्यात एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. कोकण किनारपट्टीवर 3 जूनपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला असून, ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज आहे. 

अरबी समुद्रात दोन चक्रीवादळे निर्माण झाली होती. त्यापैकी एक आफ्रिकेच्या तटावरून ओमानमार्गे पुढे येमेनच्या दिशेने सरकणार आहे, तर दुसरे वादळ भारताच्या दिशेने सरकत असून त्याचा फटका मुंबईसह कोकण किनारपट्टीला बसणार आहे. रविवारी सायंकाळपासून जिल्हाभरात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. सोमवारी सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते. सायंकाळनंतर पावसाला सुरवात झाली. रत्नागिरी, राजापूर, संगमेश्‍वरसह चिपळूण, लांजा तालुक्‍यात मुसळधार पाऊस झाला. चिपळुणात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. अचानक आलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने दाणादाण उडवली. 

वादळ 3 जूनला धडकेल, अशी शक्‍यता आहे. या वादळाची दिशा पाहता सर्वाधिक फटका रायगड, मुंबई या जिल्ह्यांना बसू शकतो. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये किनारी भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

 हे पण वाचा - ..त्यामुळे मी रात्रभर झोपलो नाही ; नितेश राणेंनी पुढे आणले आहे धक्कादाय सत्य

फयान वादळाची तीव्रता लक्षात घेऊन राज्य शासनाने किनारी भागातील जिल्ह्यांमध्ये सुरक्षिततेसाठी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एनडीआरएफच्या 26 जवानांचे पथक दाखल झाले असून चिपळूण येथे त्यांची व्यवस्था केली आहे. या पथकाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. सायंकाळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आढावा बैठक घेऊन महावितरण, बंदर विभाग, मत्स्य विभागासह विविध यंत्रणांकडून तयारीचा आढावा घेतला. 

मॉन्सून लवकरच कोकणात 
मॉन्सूनचा प्रवास सुरू झाला असून केरळमध्ये प्रवेश झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कोकणात मॉन्सूनचा प्रवेश होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. 

आंबा बागायतदारांना फटका 
सलग दुसऱ्या दिवशी पडलेल्या पावसाचा परिणाम अखेरच्या टप्प्यात असलेल्या आंबा हंगामावर झाला आहे. वेगवान वाऱ्यामुळे झाडावरील आंबा खाली पडला आहे. पावसामुळे कॅनिंगचे दरही घसरले आहेत. शेवटच्या टप्प्यात मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी फिरले आहे. 

 हे पण वाचा - रत्नागिरीत मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

loading image