
Police Arrest Youth After Missing Girl Found Dead in Kudal
Esakal
कुडाळमध्ये १७ वर्षीय मुलीची प्रेम प्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मुलगी बेपत्ता होती. तिचा मृतदेह जंगलात आढळून आला आहे. कुडाळमधील घावनळे गावात ही घटना घडली असून दीक्षा बागवे असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून यात आरोपीला आणखी कुणी मदत केली, त्याने कधी हत्या केली याची चौकशी केली जात आहे.