

Rare Lagger Falcon Sighting in Ratnagiri Creates Excitement Among Birdwatchers as Konkan Records Its First Ever Sighting
sakal
रत्नागिरी: हिवाळी स्थलांतराच्या काळात विविध भागांतून दुर्मीळ पक्ष्यांचे आगमन होत असते. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील चंपक मैदानावर ‘लॅगर फाल्कन’ (Lagger Falcon) हा पक्षी आढळला आहे. कोकणातील ही साधारण पहिलीच नोंद मानली जात आहे. दोन दिवसांपूर्वी डॉ. प्रणव परांजपे यांना हा पक्षी दिसला होता. आययूसीएनच्या यादीनुसार ‘निकट धोक्यात’ श्रेणीत मोडणारा हा पक्षी रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच नजरेस पडल्याने पक्षीप्रेमी व अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.