esakal | बिबट्याचा वावर ; पिंजरे, कॅमेरे बनल्या शोभेच्या वस्तू?
sakal

बोलून बातमी शोधा

leopard not captured in camera and lock in ratnagiri do not used thi sequpimetn for forest department

नुकतेच या परिसरात बिबट्या स्वतःहून जेरबंद झाल्यानंतर लांजा शहरात दिवसाढवळ्या दिसू लागला.

बिबट्याचा वावर ; पिंजरे, कॅमेरे बनल्या शोभेच्या वस्तू?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पावस (रत्नागिरी​) : रत्नागिरी तालुक्‍यातील मेर्वी परिसरात बिबट्याने विश्रांती घेतल्यामुळे वनविभागाला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. त्याच्यासाठी लावलेले कॅमेरे व पिंजरे या दोन्ही गोष्टी शोभेच्या बनल्या आहेत.

या परिसरात गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत चार दुचाकीस्वार व एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते तसेच १० पाळीव जनावरांवर हल्ले करून जखमी केले. त्यातील पाच जनावरे मृत झाली होती. आजपर्यंत इतिहास असा आहे की, वनविभागाला बिबट्याला मारण्याचा अथवा जखमी करण्याचा कोणताही आदेश नसल्याने त्याचा जीव वाचवणे हाच मुख्य उद्देश असल्याने अपवादात्मक किंवा अपघाताने बिबट्या सापडल्यास त्यांना जवळपासच्या अधिवासात सोडले जाते.

हेही वाचा -  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझे संबंध घनिष्ठ आहेतच ; मंत्रिपदाबाबत मात्र येणारा काळच उत्तर देईल -

परंतु तो थोड्या दिवसात माघारी फिरतो. त्यामुळे त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. नुकतेच या परिसरात बिबट्या स्वतःहून जेरबंद झाल्यानंतर लांजा शहरात दिवसाढवळ्या दिसू लागला. परंतु सद्यःस्थितीत परिसरामध्ये आंबा बागायतदारांच्या फवारणीला सुरवात झाल्यामुळे येत्या काही दिवसात राखणीला गुरखे येणार असल्याकारणाने बिबट्याच्या वावरावर पुढील काही महिन्याकरता मर्यादा येण्याची शक्‍यता आहे.

पिंजरे व कॅमेरे यांच्या कक्षेत येत नाही

पकडण्यात आलेल्या बिबट्याला पिंजरा व कॅमेरा याची माहिती असल्याप्रमाणे तो वनविभागाच्या पिंजरे व कॅमेरे यांच्या कक्षेत येत नाही व त्यातून दिसला तरी वनविभागाकडे त्याला जेरबंद करण्याचे कोणतेही उपाय नसल्याकारणाने बिबट्या निवांतपणे फिरत असल्याचे चित्र सध्या तरी परिसरामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येकजण स्वतःची काळजी घेत असल्याचे दिसत असून वनविभाग मात्र गस्त घालत आहे. 

हेही वाचा - आता शेतकऱ्यांची वसुली थांबवणार -

बिबट्या आणि हल्ले

- बिबट्याची दहशत अद्याप पावस पंचक्रोशीत 
- एक बिबट्या पिंजऱ्यात गेल्यावरही दुसऱ्याचे हल्ले 
- वनविभागाने सतर्कता राखणे आवश्‍यक 
- कॅमेरे व पिंजऱ्यात बिबट्या झाला नाही कैद

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top