
खेड: गर्भाशयातील तीन किलोची गाठ काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया वालावलकर रुग्णालयात करण्यात आली. यामुळे महिलेला जणू नवजीवन लाभले. रायगड जिल्ह्यातील महाड येथील महिला गेल्या वर्षभरापासून मासिकपाळीचा त्रास, पोटदुखीमुळे त्रस्त होती. त्याशिवाय शरीरातील रक्तही फार कमी होऊन वजन घटले होते. या तक्रारी साधारपणे चाळीशीच्या बऱ्याच स्त्रियांना असतात म्हणून सुरवातीला थोडे दुर्लक्ष केले. पण, नातेवाइकांच्या सल्ल्याने त्यांनी मुंबईत तपासणी करून घेतली.