esakal | सिंधुदुर्ग वासीयांनो तुमच्या आरोग्यासाठी या लिंकचा करा वापर....

बोलून बातमी शोधा

Link to Citizens Health Survey in sindudurg kokan marathi news

जिल्ह्यात सर्व नागरिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू आहे. ही तपासणी अधिक गतीने व्हावी व नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने लिंक तयार केली आहे.

सिंधुदुर्ग वासीयांनो तुमच्या आरोग्यासाठी या लिंकचा करा वापर....
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात सर्व नागरिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू आहे. ही तपासणी अधिक गतीने व्हावी व नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने https://sossindhudurg.in ही लिंक तयार केली असून त्यामध्ये नागरिकांनी स्वतःची संपूर्ण माहिती स्वतःहून भरावयाची आहे. तसेच एखाद्या डॉक्टरना पेशंटसंबंधी काही माहिती द्यावयाची असेल तर तीही या लिंकच्या माध्यमातून देता येणार आहे. त्यासाठी क्यु-आर कोडची सुविधाही उपलब्ध आहे. या लिंकच्या माध्यमातून नागरिक त्यांचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक यासह आरोग्याची माहिती भरू शकणार आहेत. 

नागरिकांच्या आरोग्याच्या सर्वेक्षणासाठी लिंक

  आरोग्याच्या माहितीमध्ये त्यांना ताप, खोकला, सर्दी असे काही आहे का ? तसेच इतर काही आजार जसे मधुमेह, हायपरटेन्शन आहे का ? याची संपूर्ण माहिती देता येणार आहे. या लिंकच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याचा सर्वे करणे सोपे जाणार आहे.कोरोना विषाणू संदर्भात करण्यात आलेल्या तयारीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट दिली. कोविड – 19 कक्षामध्ये बेड्स व सुविधा कशा वाढवता येतील याविषयी जिल्हा शल्यचिकित्सक व डॉक्टर्स यांच्याशी चर्चा केली.

हेही वाचा- उपासमारीमुळे पळाले, पोलिसांना सापडले


वाहतूक परवानासाठी ॲप

 सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी परवाने देण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाने ॲप तयार केले असून या माध्यमातून वाहतुकीचे सर्व प्रकारचे परवाने देण्यात येत आहेत. नागरिक घरबसल्या हे ‍ॲप डाऊनलोड करून अत्यावश्यक प्रवासासाठीचे परवाने घेऊ शकतात. यासाठी covid19.mhpolice.in या लिंकवर जाऊन ॲप डाऊनलोड करावा लागणार आहे. 

हेही वाचा-सतर्कता..आणखी सहा नमुने तपासणीसाठी


जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःचा आदेश बदलला

 जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून रस्ते, विद्युत, बीएसएनएल आणि पाणी पुरवठा विभागकडिल दुरुस्तीची कामे करण्यास मंजूरी देणारा आदेश मंगळवारी सकाळी काढला होता. मात्र, याच दिवशी सायंकाळी पुन्हा नव्याने आदेश काढत जिल्ह्यातील अत्यावश्यक दळणवळणाच्या सुवधांची जसे रस्ते, यांची कामे थांबवण्याचे आदेश देत आपलाच आदेश काही तासांत रद्द केला आहे. 

हेही वाचा-वाहतूक नियंत्रणासाठी असा जालीम उपाय


होम क्वारंटाईनचे नियम मोडल्याप्रकरणी १८८ गुन्हे दाखल

जिल्ह्यात होम क्वारंटाईनचे नियम मोडल्या प्रकरणी एकूण १८८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. तसेच ते कोणत्याही प्रकारे प्रवास करू शकत नाही. गर्दीमध्ये मिसळू शकत नाहीत. अशा नियमांचे पालन न केल्या प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


अजुन धोका टळलेला नाही

कोरोना विषाणूचा असलेला धोका कमी झालेला नसून नागरिकांनी आजून खबरदारी बाळगावी व जबाबदारीने वागावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.