रत्नागिरी : गणपतीपुळेत माघी गणेशोत्सव सुरू

गणेश याग, कीर्तन; दोन हजार भक्तांची हजेरी
Ganpatipule
Ganpatipule sakal

रत्नागिरी : तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील मंदिरात आजपासून माघी गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी सकाळी महापूजा, सायंकाळी गणेश याग आणि कीर्तन घेण्यात आले. कोरोनाचे निर्बंध शिथिल असल्याने भक्तांनी दर्शनासाठी हजेरी लावली.

Ganpatipule
राज्यात कोरोना मृतांचा आलेख वाढला; दिवसभरात १८०६७ नव्या रुग्णांची भर

कोरोनामुळे दोन वर्षे अनेक भक्तांना माघी गणेशोत्सवात गणपतीपुळे मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी येण्याची संधी मिळालेली नव्हती. स्थानिक ग्रामस्थळी दर्शन घेऊ शकत नव्हते. पहिल्या लाटेवेळी मंदिरच बंद ठेवल्यामुळे उत्सव झाला नाही. पालखीही निघालेली नव्हती. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये पुजा-पाठ केले होते. यंदा कोरोनाचे बाधित कमी असल्यामुळे भक्तांसह आयोजकही उत्साहात होते. श्रींची मुर्तीही सजवण्यात आली होती. मंदिराला विद्युत रोषणाई केली गेली होती.

Ganpatipule
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

मंगळवारी सकाळी महापूजा करण्यात आली. मंदिराचे सचिव विनायक राऊत हे पुजेला बसले होते. प्रथेप्रमाणे सायंकाळी गणेश याग आणि त्यानंतर किर्तन झाले. दिवसभरात मंदिरात दोन हजार भक्तगणांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. ४ फेब्रुवारीला गणेश जयंतीदिनी सहस्त्र मोदक अर्पण म्हणजेच सहस्रनाम, प्रतिदिन सायंकाळी साडेसात ते रात्र साडेनऊला किर्तन होणार आहे. ५ फेब्रुवारीला ललिताच्या कीर्तनाने माघी गणेशोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. माघी गणेशोत्सव हा कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे व अटींचे काटेकोर पालन करून पार पाडण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com