esakal | Good News : महाराष्ट्र-गोवा सीमा उद्यापासून खुल्या
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra goa border open from tomorrow in sindhudurg

तपासणी नाक्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांना सीमा खुली होण्याबाबत विचारले असता अजूनपर्यंत आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले.

Good News : महाराष्ट्र-गोवा सीमा उद्यापासून खुल्या

sakal_logo
By
निलेश मोरजकर

बांदा : महाराष्ट्र-गोवा सीमेवरील गोवा पोलिसांच्या पत्रादेवी पोलीस तपासणी नाक्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी मोठ्या संख्येने आज गर्दी झाली होती. तपासणी नाक्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांना सीमा खुली होण्याबाबत विचारले असता अजूनपर्यंत आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील सर्व सीमा उद्यापासून खुल्या करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन अधिकृतपणे निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. 

हेही वाचा - कोकणात २० वर्षात वाढणार जंगल ; जपानी मियावाकी फॉरेस्टचा अविष्कार...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले ५ महिने महाराष्ट्र-गोवा सीमा बंद आहे. सीमा खुली झाल्यास गोव्यात नोकरीसाठी जाणाऱ्या शेकडो तरुणांचा प्रश्न मिटणार आहे. तसेच गोव्यात अडकलेल्यांना जिल्ह्यात येण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर तपासणी नाक्यावर गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या आज लक्षणीय होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी गोवा नाक्यावर नोंदणी करण्यासाठी रांगा लागल्याचे  चित्र दिसत होते. 

हेही वाचा - तारिख पें तारिख अजून किती वर्षे वाट पाहायची ? 

नाक्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांना सीमा खुली करण्याबाबत विचारणा केली असता अजूनही वरिष्ठांकडून आदेश आले नसल्याचे सांगितले. सीमेवरील सिंधुदुर्ग पोलीस तपासणी नाक्यावरील पोलीस कर्मचारी देखील सीमा खुली होण्याबाबत अनभिज्ञ आहेत. आज मोठ्या संख्येने जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची नोंदणी पत्रादेवी तपासणी नाक्यावर करण्यात आली.

संपादन - स्नेहल कदम