

“Thackeray faction leader Bal Mane addressing the media, alleging 20 years of decline in Ratnagiri and affirming MVA’s strong position in the district.”
Sakal
रत्नागिरी : रत्नागिरीकरांना विकसित रत्नागिरी पाहायची आहे. गेल्या वीस वर्षांत रत्नागिरीची अधोगती झाली आहे; परंतु नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी भक्कम असून, आम्ही सर्व जागा लढवत आहोत. रत्नागिरीकरांना आम्ही दहा वर्षे टिकणारे दर्जेदार रस्ते, गटार योजना, स्वच्छ पाणी आणि सुसज्ज रुग्णालय देऊ. एवढी वर्षे मतदार सक्षम पर्यायाच्या शोधात होते, आता आम्ही सत्ताधारी म्हणून उत्तम पर्याय आहोत, असे महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी सांगितले.